25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️बेंद्री गाव एक महिण्यापासून अंधारात.

♦️बेंद्री गाव एक महिण्यापासून अंधारात.

शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गांधी गिरी करुन काम चुकार अधिकाऱ्यांचे दर्शन घेवून सत्कार केला. दर्शन लाईट ऑफिसचे, नायगाव विधानसभा युवक काँग्रेसचे आगळे वेगळे आंदोलन
मागच्या एक महिण्यापासून नायगाव तालुक्यातील बेंद्री येथे विद्यूत पुरवठा बंद असल्याने गाव तर अंधारात आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची पाय पीट होत असून आटा चक्की बंद आहेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना विज वितरण कंपनीचे अधिकारी काहिच हालचाली करत नसल्याने युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गांधी गिरी करत कामचुकार अधिकाऱ्यांचे दर्शन घेवून त्यांचा सत्कार केला आणि विद्यूत पुरवठा सुरु करण्याचे साकडे घातले.

बेंद्री गावचा विद्यूत पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी ग्रामस्थांनी विज वितरण कंपनीच्या नायगाव येथील अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी अनेकवेळा फोन केला पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच बरोबर या भागाचे आमदार राजेश पवार यांना फोन करुन बंद असलेल्या विज पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी असंख्य नागरिकांनी फोन केला पण आमदार महोदयांनी एकाही ग्रामस्थांच्या फोनला प्रतिसाद दिलेला नाही. उलट नागरीकांना देव दर्शनाला घेवून गेल्याचा डांगोरा पिटत असल्याने बेंद्रीच्या ग्रामस्थांनी नागरिकांचे प्रश्न सोडवणे तर दुरच राहीले पण फोनही घेत नसल्याने आमदार राजेश यांच्याबद्दल कमालीचा संताप व्यक्त करत आहेत.

नायगाव तालुक्यातील बेंद्री हे गाव मागच्या एक महिण्यापासून आंधारात आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट होत असून आटा चक्की बंद आहे, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना विज वितरण कंपनीचे अधिकारी काहीच हालचाली करत तर लोक प्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे या प्रकरणी युवक काँग्रेसचे रवींद्र पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवास पा. चव्हाण यांच्या उपस्थितीत युवक काँग्रेसचे रावसाहेब पा. शिंदे मांजरमकर, काळबा पा. कदम, बाबाराव पा. कदम विलास पा. कदम बेंद्री, संदीप पा.रातोळीकर, साई पा. मोकासदरेकर, गावचे उपसरपंच नागोराव पा. कदम, आत्माराम पा.बेंद्रीकर, विलास पा. बेंद्रीकर, शरद पा. बेंद्रीकर, सुनील पा. बेंद्रीकर, नागनाथ आप्पाराव पा.कदम, नारायण हरी पा. बेंद्रीकर, मारुती पा. कदम, दशरथ कसबे,राजेश पा. हंबर्डे, मानसिंग पा. ताटे, केशव पा.वडजे, योगेश पा. गडगेकर, परमेश्वर पा. बेंद्रीकर, मोहन पा. पवार होटाळकर आदी कार्यकर्त्यांनी मंगळवारी गांधीगिरी करुन धडा शिकवण्यासाठी ‘दर्शन लाईट ऑफिसचे’ अशी मोहीम राबवून विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि कामचुकारपणा करण्यात तरबेज असल्याचे निदर्शनास आणून दिले व उप कार्यकारी अभियंता अनिलकुमार तिवारी व अन्य एका अभियंत्याचा सत्कार केला व तत्काळ विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले.

युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेगळ्या पद्धतीने विज वितरण कंपनीच्या कामचुकार अधिकाऱ्यांचा सत्कार करुन गांधीगिरी केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.

यापुढे अशाच पद्धतीने दर्शन आँफीसचे या सदराखाली गांधीगिरी करुन भ्रष्ट व कामचुकार अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या