16.5 C
New York
Tuesday, October 27, 2026

Buy now

spot_img
spot_img

⚫ बेंद्री येथील ज्येष्ठ नागरिक आनंदाराव पाटील बेंद्रीकर यांचे निधन.

⚫ बेंद्री येथील ज्येष्ठ नागरिक आनंदाराव पाटील बेंद्रीकर यांचे निधन. 

वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; रविवारी सकाळी अंत्यसंस्कार

शिवगर्जना न्यूज,

नायगाव : बाळासाहेब पांडे

बेंद्री (ता. नायगाव) येथील ज्येष्ठ नागरिक आनंदाराव माधवराव पाटील बेंद्रीकर (वय ८७ वर्षे) यांचे शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने बेंद्री गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आनंदाराव पाटील बेंद्रीकर हे गावातील ज्येष्ठ नागरिक म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. बालाजी पाटील बेंद्रीकर आणि आत्माराम पाटील बेंद्रीकर यांचे ते वडील होत.

त्यांच्यावर रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता बेंद्री येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने पाटील बेंद्रीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या