8.2 C
New York
Tuesday, April 7, 2026

Buy now

spot_img
spot_img

⚫ ग्रामसेवक संघटनेचे आधारस्तंभ श्रीकांत बोंडावर काळाच्या पडद्याआड.

⚫ ग्रामसेवक संघटनेचे आधारस्तंभ श्रीकांत बोंडावर काळाच्या पडद्याआड. 

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी

देगलूर:- तालुक्यातील शेळगाव (नृसिंह) गावासहीत ईतर गावातील विकासाचे स्वप्न रेखाटले, ज्या शब्दांनी ग्रामस्थांच्या अडी अडचणीत मायेची फुंकर घातली आणि ज्या कर्तृत्वाने देगलूर तालुका ग्रामसेवक संघटनेला एक नवी उभारी दिली, ते सर्वांचे लाडके श्रीकांत बोंडावर आज आपल्यात राहिले नाहीत. २४ मार्च रोजी सायंकाळी ०८ ते  ८:३० सुमारास देगलूर-मिर्जापूर रोडवरील आर.टी.ओ. ऑफिस जवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात त्यांची प्राण ज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देगलूर तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.

कर्तव्य दक्षता आणि माणुसकीचा संगम श्रीकांत बोंडावर हे केवळ एक शासकीय अधिकारी नव्हते, तर ते  ग्रामस्थांण चे आधारस्तंभ होते. ग्रामपंचायत प्रशासनात त्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचा आणि कष्टाचा जो ठसा उमटवला, तो कधीही पुसता येणार नाही. “कामा प्रती निष्ठा आणि माणसांप्रती जिव्हाळा” हेच त्यांच्या आयुष्याचे सूत्र होते. ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी प्रत्येक सहकाऱ्याला भावा प्रमाणे जपले. त्यांच्या जाण्याने संघटनेचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

ती ‘काळरात्र’ आणि सुन्न झालेला देगलूर नेहमी प्रमाणे उत्साहात असणारे श्रीकांत २४ मार्चच्या रात्री ०८ ते ८:३०  सुमारास आपल्या कामावरून परतत असताना, काळाने आर.टी.ओ. ऑफिस जवळ दबा धरून घात केला. हा अपघात इतका भीषण होता की, एका क्षणात एका उमद्या अधिकाऱ्याचा प्रवास थांबला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तालुका सुन्न झाला. प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणि ओठावर बोंडावार… इतक्या लवकर कसे जाऊ शकतात?” हाच प्रश्न होता.

सदैव चेहऱ्यावर हसू, मदतीला धावून जाण्याची वृत्ती आणि प्रशासकीय कामातली तत्परता यामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार असून, नियतीच्या या क्रूर खेळामुळे बोंडावर परिवारावर आघात झाला आहे. एका कर्तव्यदक्ष पुत्राला, पित्याला आणि मार्गदर्शकाला समाजाने आहे.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि त्यांच्या शोकाकुल परिवाराला हे अतीव दुःख सहन करण्याची शक्ती देवो. 

मा. गटविकास अधिकारी देगलूर, विस्तार अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक संघटना वतीने भावपूर्ण प्रार्थना. 😭😭

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻🙏🏻

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या