*जगाचा पोशिन्दा बळीराज्या च्या न्याय हक्का साठी किसान कामगार संवाद यात्रेचा आरंभ*
दि.०२/१०/२०२३ भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा जगाचा पोशिन्दा बळीराज्या च्या न्याय हक्कासाठी किसान कामगार संवाद यात्रेचा आरंभ *कैलासभाऊ येसगे शेतकरी नेते* यांच्या नेतृत्वात *डॉ. सुनील जाधव संभाजी ब्रिगेड* यांनी करडखेड पुर्वारेश्वर / शिवमंदिर गाभाऱ्यात पुर्वारेश्वरा समोर सत्यम शिवम सुंदरम गीत गाऊन शेतकऱ्यांच्याच हस्ते आरती करून ३० सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आला. शेतकरी, कष्टकरी, कामगार रयतेला गुलातुन मुक्त करून हक्क न्याय मिळुन देण्यासाठी स्वराज्य स्थापण्यासाठी छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्या सह शपथ घेतली व स्वराज्य स्थापन करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. त्यांचा आदर्श समोर ठेऊन पुर्वारेश्वर मंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी बांधवांच्या उपस्थिती मधे शेतकऱ्याला हक्कं मिळुन देण्याचा वसा घेऊन किसान संवाद यात्रा आरंभ केली. या वेळी झालेल्या संवाद सभेचे *प्रास्थाविक* कैलास येसगे यांनी केले. *अनुमोदन* किशन पांचाळ यांनी दिले. *शेतकरी सन्मानार्थ गीत* काळया मातीत मातीत तिफन चालते गायन व *सुत्रसंचालन* डॉ. सुनील जाधव यांनी केले. यावेळी संभाजी ब्रिगेड चे सदाशिव पाटील सुगावे, दिलीप सूगावे सर, शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलमंबरकर, प्रा.गंगाधर हिन्गोले सर यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या, मागण्या त्या वरील उपाय यावर संवाद साधुन प्रकाश टाकुन *सखोल मार्गदर्शन* केले या वेळी मंचावर खंडागळे सर, मराठा मावळा संघटनेचे नारायण पाटील वडजे, संभाजी ब्रिगेड जेजेराव पाटील शिंदे, संजय कांबळे, दिव्यांन्ग आघाडी चे राजु आंगडे, वीरभद्र बिरादार, पत्रकार सैफ सर, रमेश घुळेकर, युवा नेत्रुत्व निशिकांत कांबळे, यादवराव माऊली कर, निखील जाधव आदींची उपस्थिती होती. यात्रेत करडखेड सह तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेवटी *आभार* डॉ.सुनील जाधव यांनी मानले. शिवमंदिरातुन रथा सह यात्रा सुरु होऊन कावळगाव, देगलुर, खानापूर, शहापूर येथे संवाद सभा घेत मार्गक्रमण करत बिलोली हुन नांदेड़ कडे रस्त्यातील गावातुन प्रस्थान करत संवाद साधत शेतकऱ्यांच्या विविध समस्या, मागण्या जाणुन घेऊन, निवेदनावर सह्या घेत हक्क मिळवण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय ते मुख्यमंत्र्या कडे जाणार आहे .















