*गिरणा नगर ग्रामपंचायत नांदगाव येथे “मेरी मिट्टी मेरा देश” या उपक्रमांतर्गत*
मा.स्वप्नील धनवटे
नासिक.
सुशोभित केलेला मातीच्या कलशामध्ये बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन
मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार *मेरी मिट्टी मेरा देश* या अभियानाचा एक भाग म्हणून गिरणानगर ग्रामपंचायत, नांदगाव यांनी सहभागी होऊन सुशोभित केलेल्या मातीच्या कलश यामध्ये बंधू-भगिनींकडून “मेरी मिट्टी मेरा देश” संकल्पनेनुसार या परिसरातील मातीचे संकलन केले. त्यांनी संकल्पनेनुसार कलश यामध्ये माती टाकून सहभाग नोंदवला.
कलश यामध्ये टाकलेली माती पंचायत समिती, नांदगाव येथे देण्यात येणार आहे. या कलशातील माती दिल्ली येथे निर्माण होणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मे आणि शहीद जवान यांच्या स्मारकासाठी हा मातीचा कलश जिल्हा प्रशासनाकडून जाणार आहे.
याप्रसंगी सरपंच सौ.अनिताताई पवार, उपसरपंच, अनिल आहेर व इतर ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी ताई, आशाताई, बचत गट ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.















