⚫शहीद जवान सचिन वनंजे यांचा शासकीय इतमामात अंत्य संस्कार.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी
भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान सचिन यादवराव वनंजे यांचा देश सेवेच्या कर्तव्यावर असतांना श्रीनगरच्या परिसरात दि.६ मे रोजी अपघाती मृत्यू झाला होता. दि. ९ मे रोजी देगलूर येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात १०:३० वा. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सचिन यांचा पार्थिव देह भारतीय सैन्यदलामार्फत पहाटे ४ वा. त्यांच्या राहत्या घरी दाखल झाला. सकाळी ठिक ८.३० वाजता फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनातून शहिद सचिन वनंजे च्या घरा पासून अंत्य यात्रेला प्रारंभ झाला. देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक तसेच मुख्य रस्त्याने नगरपालिका शेजारी असलेल्या मैदानात अंत्यविधी साठी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी शहिद सचिन वनंजे, अमर रहे अमर रहे च्या घोषणां होत्या.
यावेळी खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार जितेश अंतापूरकर, मा.आमदार सुभाष साबणे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उप विभागीय अधिकारी अनुप पाटील, उप विभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, तहसीलदार भरत सुर्यवंशी, गटविकास शेखर देशमुख, मुख्याधिकारी निलम कांबळे आदींसह आजी व माजी सैनिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली व देगलूर नगरपालिका शेजारी तयार केलेले अंत्यविधीस्थळी भारतीय सैन्यदलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शहीद सचिन वनंजेच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले.
सचिन वनंजे सन २०१७ मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाला होते. त्यांची पहिली पोस्टिंग सियाचीन भागात झाली. त्यानंतर जालंधर पंजाब येथे त्यांनी सेवा केली. गेल्या दीड वर्षापासून ते श्रीनगरमध्ये कर्तव्यावर असताना दि.६ मे रोजी वाहन दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला होता.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)