⚫ सावळी येथील तंबाखूच्या भट्टीत पडून तरुणाचा मृत्यू
◼️बिलोली तालुक्यातील सावळी येथील दुसरी घटना
शिवगर्जना न्यूज,
कुंडलवाडी (सिध्दार्थ कांबळे)
बिलोली तालुक्यातील सावळी येथे असलेल्या तंबाखूच्या भट्टी मध्ये हरभऱ्याची गुळी टाकण्यासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय तरुण शेतकऱ्यांचा तोल गेल्याने भट्टीत पडून मृत्यू झाला.ही दुर्दैवी घटना दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजताच्या दरम्यान सावळी येथे घडली. गतवर्षी सुद्धा सावळीत अशीच घडली होती. बिलोली तालुक्यात डौर, डोणगाव,
सावळी, आरळी, रामतीर्थ अन्य काही भागात तंबाखाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.फेब्रुवारी व मार्च महिन्या मध्ये तंबाखू काढल्या जातो. तंबाखू पीक अंतिम टप्प्यात काढण्यासाठी आला असताना सावळीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री १:०० च्या सुमारास येथील तरूण शेतकरी राहुल सुरेश देवकरे हा हरभऱ्याची गुळी टाकण्यासाठी तंबाखूच्या भट्टी कडे गेला होता, ही गुळी टाकताना तोल जाऊन सदरील तो थेट भट्टीत पडला. यामुळे श्वास कोंडून जळाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा सावळी बीड चे जमादार कुमार प्रसाद गायकवाड यांनी केले. कुंडलवाडी च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर राहूल देवकरेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गतवर्षी राहूलच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला होता. यामुळे अगोदरच खचलेल्या आई, वडिलावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ असा परिवार आहे. सावळी येथे गतवर्षीही तंबाखूच्या भट्टीत पडून एकाचा मृत्यू झाला होता, यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)