18.3 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

*खंडणीच्या गुन्ह्यात दोघांची निर्दोष मुक्तता देगलूर न्यायालयाचा निकाल*

खंडणीच्या गुन्ह्यात दोघांची निर्दोष मुक्तता
देगलूर न्यायालयाचा निकाल

देगलूर: तालुक्यातील मरतोळी येथे शेतात घुसून बळजबरी खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोघांना देगलूर प्रथमवर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. मा. न्यायदंडाधिकारी अमितसिंह मोहने यांनी नुकताच हा निकाल दिला. जवळपास दहा वर्षे चाललेल्या या खटल्यातून सरकारी पक्षाचा आरोपींवरील दोष सिद्ध झाला नसल्याने हा निकाल देण्यात आला.

मरतोळी येथील तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील यांच्या शेतात २०१३ साली पेरणीपूर्व मशागत सुरू असताना, शेतात घुसून नरसिंग धर्मा आंदलवाड, दत्ता नरसिंग आंदलवाड व दिगंबर नरसिंग आंदलवाड या तिघांनी संगनमत करत औत अडवत खंडणी मगितल्याच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध मरखेल पोलिसांनी गुरनं. २८/२०१३ दाखल केला. सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस जमादार मारोती शंकरराव भोळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. आरोपीचे वकील ॲड. अंकुशराजे जाधव, ॲड. सद्दाम शेख दावणगीरकर यांनी दहा वर्षे चाललेल्या या खटल्यात भक्कमपणे मांडली. न्यायालयाने या खटल्यात सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासले.

सरकारी पक्ष व बचाव पक्षाच्या युक्तीवादनंतर बचाव पक्षाने केलेला युक्तीवाद व सरकार पक्ष खटला सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्याने दत्ता नरसिंग आंदलवाड व दिगंबर नरसिंग आंदलवाड या दोघांची निर्दोष मुक्तता केली. खटला सुरू असताना नरसिंग आंदलवाड यांचा मृत्यू झाल्याने त्यास वगळण्यात आले होते. ॲड. अंकुशराजे जाधव, ॲड. सद्दाम शेख दावणगीरकर यांनी बचाव पक्षाच्या वतीने काम पाहिले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या