20.6 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

*मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवानिमित्त व लक्ष अंतर्गत महाराष्ट्रातून प्रथम पुरस्कार*

*मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त व लक्ष अंतर्गत प्रथम पुरस्कार प्राप्ति चा देगलुर उपजिल्हा रुग्णालयात जल्लोष*

दिनांक १७/०९/२०२३ रोजी देगलुर उपजिल्हा रुग्णालयात मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिनी एम.एस. डॉ. नरेश देवणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या वेळी डॉ. सुनील जाधव यांनी राष्ट्रगीत, देशभक्ती गीत सादर करत अतिशय उत्साहात सोहळा साजरा केला. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित शपथ देण्यात आली. तसेच *केंद्र शासनाच्या *लक्ष कार्यक्रमांतर्गत* आसाम व चेन्नई येथील टिम ने तीन वर्षे दिलेल्या सेवा जसे आद्यवत शस्त्रक्रिया, प्रसुती ग्रह, स्वच्छता, बाह्यरूग्ण व अंतररूग्ण विभाग, गरोदर माता तपासणी, लसीकरण, प्रसुती पुर्व व पश्चात माता, बालक यांची काळजी तपासणी व उपचार, प्रसुती नंतर घरी सोडणे, कुटूंब नियोजन व विविध शस्त्रक्रिया, कर्मचाऱ्यांचे आरोग्य सेवा, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा, एल.एस.सी.एस. आदी सेवा तपासणी करून महाराष्ट्रात दोन पैकी पहिला क्रमांक देगलुर ला मिळाले असून देगलुरसाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी व देगलुर भुमीपुत्र नात्याने रूग्णास उत्तम सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार. यावेळी डॉ.कुलदीप येरमूने यांची उपस्थिती होती. यावेळी क्षय रोग नियंत्रण शपथ व रूग्ण कल्यानाची शपथ घेण्यात आली. प्रास्ताविक डॉ. सुनील जाधव तर सूत्रसंचालन डॉ. संजय लाडके यांनी केले, आभार डॉ. मुजीब यांनी मानत. सर्व स्टाफ सह *लक्ष अंतर्गत* प्रथम पुरस्कार प्राप्तिचा जल्लोष देगलुर उपजिल्हा रुग्णालयात हर्षउल्हासात साजरा करण्यात आला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या