
🔴 उंद्री (प.दे.) येथे महिला राजच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
शिवगर्जना न्यूज,
मूखेड प्रतिनिधी
देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उंद्री (प.दे.) मुखेड जिल्हा नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम जि. प. शाळेत मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे थोर महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व वंदन करून ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहणाच्या प्रसंगी अनेक असंख्य मान्यवरांची उपस्थिती लाभली. ज्येष्ठ नेते माझी सरपंच, सरपंच वनिताताई गनलेवार, उपसरपंच, पोलीस पाटील सविता विजयकुमार वादे यांच्या चे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक ताई, सिस्टर ताई, अंगणवाडी कार्यकर्ती ताई, मदतनीस ताई, आशा वर्कर ताई, बचत गट ताई, गावातील ज्येष्ठ नागरिक सर्व पदाधिकारी, नवतरुन युवक, शेतकरी बांधव, माता, बंधू-भगिनी इत्यादींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)















