16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️नायगाव शहर व तालुक्यात राम मुर्ती प्रतिष्ठापना व मंदिर वर्धापन दीन उस्थाहत साजरा.

🔴 नायगाव शहर व तालुक्यात राम मुर्ती प्रतिष्ठापना व मंदिर वर्धापन दीन उत्साहात साजरा. 

शिवगर्जना न्यूज, 

नायगाव तालुका प्रतिनिधी : परमेश्वर पाटील

नायगांव तालुक्यात व शहरात अयोध्येतील राममंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धार वर्ष पूर्ती सोहळ्या निम्मित विविध धार्मिक कार्यक्रम शोभायात्रा,महाप्रसाद वाटप कार्यक्रम घेण्यात येऊन रात्री कीर्तनाचे कार्यक्रम घेण्यात आले.राम मंदिर उभारून एक वर्ष पूर्ण झाल्या बद्दल हा सोहळा गावागावात साजरा करण्यात आला. 

नायगांव बाजार येथील पशुपतीनाथ मंदिर समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभु श्रीराम यांची पुजा आरती व महाप्रसाद भंडारा संपन्न झाला.

हनुमान मंदिर कोलंबी येथून या शोभा यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.प्रतिकृती विद्यार्थी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान हे वाहनावर विराजमान झाले होते, शोभा यात्रेचे आकर्षण शंकरराव चव्हाण विद्यालय,व कोलंबी के.प्रा.शाळेचे विद्यार्थी यांनी सादर केलेली लेझिम नृत्य हे ठरले, महिला, अबाल वृद्ध, तरुण मंडळी यांनी या मध्ये सहभाग घेतला. शेवटी हनुमान मंदिर येथे महाप्रसाद, कीर्तन सोहळा घेण्यात आला. नायगाव तालुक्यात विविध ठिकाणी हा महाआरती, धार्मिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास रामभक्त सुरेश पाटील कल्याण, सुभाष पाटील कल्याण, अभिजित पाटील कल्याण बेटकर भारत सर, व्यंकटराव, पवार एम जी, महीद्र शेठ, दिलीप कल्याण, रघुनाथ कल्याण, माधव पाटील कल्याण, कैलास पाटील कल्याण, गंगासागरे ,गजू पाटील कल्याण मंदिर पुजारी गंगाधर स्वामी खैरगावकर, दत्ता आनमवाड सचिन फुलारी, शिवराज स्वामी आदी उपस्थित राहून परिश्रम घेत महाप्रसाद वाटप केले . 

शहर परिसरात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कोलंबी येथील राम भक्तांच्या वतीने महाप्रसादासह भव्य शोभा यात्रा, रात्री कीर्तन सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी कोलंबी मठाचे महंत श्री १०८ यदुबन गुरू गंभीरबन महाराज यांचे प्रतिनिधी दयाळ बन महाराज यांच्या शुभ हस्ते दरेगाव पाटी ते कोलंबी मार्गाला श्रीराम मार्ग असे नामकरण करीत पाटी चे अनावरण करण्यात आले या सोहळ्यास सरपंच शिवाजी शिंदे, प्राचार्य बामणे, बुरपले, श्री बाळासाहेब पांडे व शंकरराव चव्हाण विद्यालयातील राम, लक्ष्मण, सीता व राम भक्त हनुमान प्रतिकृती विद्यार्थी, सर्व कर्मचारी, विद्यार्थी, गावातील राम भक्त हजर होते.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या