🔴 सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून ८१२ कोटी मंजूर
शिवगर्जना न्यूज
नांदेड
नांदेड दि. ७ जानेवारी : नांदेड जिल्ह्यातील माहे सप्टेबर, २०२४ मधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी मंजुर केले आहे.
नांदेड जिल्ह्यात सप्टेबर २०२४ या महिन्यात अतिवृष्टीमुळे पिक नुकसान झालेल्या ७,८३,९१५ शेतकर्यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी ३८ लक्ष इतकी रक्कम मंजूर केली आहे. ही रक्कम बाधित शेतकरी यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी आता पर्यंत जिल्हृयातील ३,८३,२९७ इतक्या शेतकर्यांना ४१७ कोटी ५२ लक्ष इतक्या रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे.
माहिती भरण्यात आलेल्या शेतकऱ्याचे संदर्भ क्रंमांक ( व्ही.के. नंबर ) त्या त्या गावाच्या तलाठयांना देण्यात आले आहेत. ( व्ही.के. नंबर ) या संदर्भ क्रमांकाद्वारे सेतू सुविधा/ आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणा-या शेतकर्यांच्या खात्यावर थेट मदतीची रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत ४ लक्ष शेतकरी यांची माहिती पुढील २ दिवसात भरण्यात येणार आहे.
त्यामुळे सप्टेबर २०२४ या महिन्यात अतिवृष्टीमुळे पिक नुकसान झालेल्या शेतकरी यांनी आपल्या तलाठीकडे जाऊन आपला संदर्भ क्रमांक घ्यावा व ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी, जेणे करुन त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)