🔴 राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटने कडून पत्रकारांचा गौरव.
शिवगर्जना न्यूज,
देगलुर तालुका प्रतिनिधी
9923072242
६ जानेवारी हा दिवस सबंध महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ६ जानेवारी १८१२ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस तथा वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८३२ मध्ये मराठीतले पहिले वर्तमानपत्र दर्पण या नावाने सुरू केले. गुलामगिरीला झुगारून निर्भीड व निष्पक्ष लिखाणातून आपला ठसा उमटवणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर सबंध महाराष्ट्रातील पत्रकारितेचे जनक बनले.
याच दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय पत्रकार संघ भारत या संघटने तर्फे अनेकांगी पत्रकारितेत कार्य करणाऱ्या पत्रकारांचा शाल, पुष्पहार व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या लेखणीच्या माध्यमातून कोणाचे दडपण न ठेवता पत्रकार निष्ठापूर्वक काम करत असतात. त्यांना विमा नाही, सरकारी संरक्षण नाही, पत्रकार भवन नाही, तसेच योग्य मोबदला नाही परंतु समाजाची बांधिलकी म्हणून पत्रकार सत्यासाठी लढत असतात.
दर्पण दिनानिमित्त कार्यक्रम समर्थ वाचनालय देगलूर येथे घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार अविनाश देशपांडे हसनाळकर तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक मारुती मुंडे हे उपस्थित होते. यासह संघटनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट इर्शाद पटेल, रामचंद्र भंडरवार, अनिल कदम, फजल मुल्ला, श्याम वद्देवार, असलम शेख, शादुल पटेल, यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संघटनेचे ता.अ. योगेश जाकरे तर प्रस्तावना जिल्हा कार्याध्यक्ष मारुती कुडकेवार यांनी मांडली. तसेच आभार प्रदर्शन माणिक सूर्यवंशी यांनी मांडले. कार्यक्रमात जेष्ट पत्रकार अविनाश हसनाळकर, सुभाष अल्लापुरकर, जिल्हाध्यक्ष इर्शाद पटेल व मार्गदर्शक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करीता जिल्हा सचिव लक्ष्मण पवार, शशिकांत पटणे, शहाजी वरखिंडे, सुभाष वाघमारे, विठ्ठल भंडरवार, अजीम अन्सारी, यादव ढाले, पिराजी इबितवार, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात देगलूर तालुक्यातील विविध नामांकित पत्रकारांची आवर्जून उपस्थिती होती.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)