🔴 देगलूर महाविद्यालयातील रासेयो व रुग्ण सेवा मंडळाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर : प्रतिनिधी
अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रुग्ण सेवा मंडळ देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे येरगी येथे एक दिवशीय मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले आहे.
प्रस्तुत नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण ८१ वृद्ध नागरिक, शेतकरी – शेतमजुर तसेच विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या प्रसंगी रुग्ण सेवा मंडळातील नेत्र ंतंत्रज्ञ डॉ. अरुणा तोरणे यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली आहे.
नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी रुग्ण सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सूर्यकांत नारलावार, सचिव मनोहर दाशेटवार, सह सचिव प्रा. डॉ. बालाजी कतूरवार, कोषाध्यक्ष प्रा. व्ही.जी. चिंतावार, कार्यकारणी सदस्य देवेंद्र मोतेवार यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय देबडे, डॉ. व्यंकट खंदकुरे, प्रा. गणेश क्यादारे, डॉ. संतोष येरावार, प्रा. शिवचरण गुरुडे व रासेयो विद्यार्थ्यानी प्रयत्न केले.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)