20.2 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा.

🔴 नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी निळकंठ जाधव 

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नरसी येथील आदित्य मंगल कार्यालयात सोमवारी दि.६/१/२०२५ रोजी दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दर्पण दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नीत नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आदित्य मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लोकपत्रेवार, प्रा.डॉ. दयानंद माने, जि. उपाध्यक्ष सुभाष पेरकेवार, जिल्हा संघटक पंडित वाघमारे, नायगाव तालुका अध्यक्ष लक्ष्मण बर्गे, गोविंदराव टोकलवाड, आदीची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रजावाणीचे उप संपादक संजय बुडकेवार, अर्धापूर पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती तुकाराम चिंचवाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

यावेळी तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष हनुमंत वाडेकर यांनी प्रस्ताविक केले. पत्रकार प्रभाकर लोकपत्रेवार, भूषण पारळकर, माधव पा. चव्हाण, दिलीप वाघमारे, शेषेराव कंधारे, मनोहर मोरे, ढगे पाटील, हनुमंत चंदनकर, मारुती सूर्यवंशी, आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. मराठी पत्रकार संघ नांदेड जिल्हा मा. अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. 

उपस्थित मा. तालुका अध्यक्ष सय्यद जाफर, कैलास तेलंग, परमेश्वर जाधव, शेख आरिफ, अंकुश देगावकर, अशोक पा.जाधव, शेख सत्तार इमानदार, बालाजी हणमंते, साहेबराव धसाडे, प्रकाश महिपळे, महादेव बैलकवाड, किरण वाघमारे, सय्यद अजीम, रामकृष्ण मोरे, यशवंत मोरे, ज्ञानेश्वर तोडे, शेषराव बेलकर, अनिल कांबळे, अशोक वाघमारे, शिवाजी पांचाळ, श्याम गायकवाड, आनंद डाकोरे, देविदास सूर्यवंशी, सहदेव तुरटवाड, वीरेंद्र डोंगरे, अशोक वाघमारे, गंगाधर ढवळे, किरण शिंदे, तानाजी शेळगावकर, गणेश कंदुरके, दीपक गजभारे, सिद्धार्थ गजभारे, धमादीप बदरे, प्रदीप जोंधळे, यांच्यासह प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका पत्रकार संघाचे सरचिटणीस रघुनाथ सोनकांबळे सूत्र संचालन केले तर ऋषिकेश शेषराव कंधारे यांनी आभार मानले.

🔴 दर्पण दिना निमित्त रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने नायगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे स.पो.नी. श्रीधर जगताप, पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जांभळीकर, पोलीस कॉन्स्टेबल शिव शंकर शिंदे बेळीकर व पत्रकार उपस्थित होते.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या