🔴 व्हॉईस ऑफ मीडिया नायगाव वतीने दर्पण दिनी पत्रकार गौरव सोहळ्याचे आयोजन.
शिवगर्जना न्यूज,
प्रतिनिधी : निळकंठ जाधव
व्हॉईस ऑफ मीडिया नायगाव तालुका व शहर शाखेच्या वतीने दिनांक ६ जानेवारी रोजी दुपारी दोन वा. स्व.माजी आ. बळवंतराव चव्हाण सभागृह जनता हायस्कूल नायगाव येथे लढा ग्रामीण पत्रकार व पत्रकारितेचा. या उपक्रमअंतर्गत ग्रामीण पत्रकारिता एक आव्हान या विषयावर वीरभद्र मिरेवाड यांचे व्याख्यान व पत्रकार गौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार “आचार्य बाळशास्त्री जांभेकर” यांनी जन सामन्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रथम प्रकाशित केलेल्या “दर्पण” या मराठी वृत्त मुखपत्र चा वर्धापन दीन म्हणजेच पत्रकार दिन या निमित्त त्याना अभिवादन करण्या साठी तालुक्यातील पत्रकार यांचा गौरव करण्यासाठी पत्रकार गौरव सोहळा व्हॉईस ऑफ मीडिया नायगाव च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आर.सी. शेख पोलीस उप अधीक्षक, प्रमुख पाहुणे म्हणून एल.आर. वाझे (गट विकास अधिकारी नायगाव), संग्राम कांबळे (गट शिक्षणाधिकारी नायगाव), संजय मारकड (पोलीस निरीक्षक, नायगाव), रामकृष्ण पाटील (स.पोलीस निरीक्षक कुंटूर), श्रीधर जगताप (स.पोलीस निरीक्षक, रामतीर्थ)बाळासाहेब पांडे (जिल्हा कार्याध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया नांदेड), एस.एम. मुदखेडकर जिल्हा कार्य. सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात लढा ग्रामीण पत्रकारिता अंतर्गत “ग्रामीण पत्रकारिता एक आवाहन” या विषयावर वीरभद्र मिरेवाड ज्येष्ठ साहित्यिक तथा व्याख्यातेयांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
गौरव पत्रकाराचा उपक्रमांतर्गत वयाचे ५५ पार केलेले ज्येष्ठ पत्रकार माधव मामा कोकूरले, शेख वहाबुद्दिन साब, गंगाधर पा. भिलवंडे यांचा सन्मान व नूतन जिल्हा पदाधिकारी, नागेश पा. कल्याण, शिवाजी पनासे, प्रकाश भाऊ हणमंते, भगवान शेवाळे, पवन कुमार पुटेवाड व ज्येष्ठ पत्रकार नायगाव यांचा सत्कार करण्यात येणार आहेत. सन २०२४ मध्ये विशेष पुरस्कार प्राप्त पत्रकार देविदास जेठेवाड संविधान गौरव पुरस्कार २०२४, चंद्रकांत सुर्यतळ स्व.शंकरराव चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार २०२४ यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडिया नायगाव च्या सर्व शिलेदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष गंगाधर ढवळे पाटोदेकर, बालाजी नागठाणे तालुका कार्याद्यक्ष, वसंत जाधव तालुका सरचिटणीस, संभाजी वाघमारे ता.अध्यक्ष डिजिटल विंग, करिम चाऊस ता.अध्यक्ष साप्ताहिक विंग, शिवाजी कुंटूरकर शहराध्यक्ष नायगाव, अरविंद शिंदे शहर कार्याध्यक्ष नायगाव सर्व तालुका व शहर पदाधिकारी सदस्य व्हॉईस ऑफ मीडिया नायगाव यांनी केले आहे.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞
(9923072242)