30 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️स्त्री शिक्षणास महत्त्व देणारी सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.

 

🔴 स्त्री शिक्षणास महत्त्व देणारी माता सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.

शिवगर्जना न्यूज,
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर : दिनांक ३/१/२०२५ रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती पार पडली. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडी करून देणाऱ्या स्त्रियांच्या उद्गारकर्त्या, माता सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त, बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल पट्टणकोडोली, मध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये विशेष करून सर्व इयत्तेतील मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. बऱ्याच मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत जीवनावर आधारित माहिती आपल्या वक्तृत्वातून सादर केली. सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षकांचे, मुख्याध्यापक व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पालकांनी सुद्धा आप आपल्या पाल्यांची उत्तम अशी तयारी करून घेतलेली पहावयास मिळाली. कार्यक्रमात अद्वीता अंबर बनगे, साई स्वस्तिक बेहेरा, प्रीशा प्रशिक त्रिरत्ने, मयुरी मनोज पाटील, मंजीत कुमार भारती ईतर विद्यार्थीनी भाषणे केली.

न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल मधील वर्ग शिक्षिका नीता पाटील ह्यांचे सहकार्य लाभले.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞
(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या