16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी श्री समर्थ वाचनालय देगलूर येथे साजरी.

🔴 संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी श्री समर्थ वाचनालय देगलूर येथे साजरी

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी

श्री समर्थ वाचनालय देगलूर येथे स्वच्छतेचे महान पुजारी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रंथालयाचे ग्रंथपाल पुंडलिक कदम व नरसिंगराव पोळ सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल पुंडलिक कदम यांनी उपस्थितांना त्यांच्या महान कार्याची थोडक्यात माहिती सांगितली.

स्वच्छतेचा जागर त्यांनी त्यावेळी त्यांच्या कीर्तनातून व भजनातून लोकांना करत असत. देव पहावयाशी गेलो।देवची होऊनी ठेलो।। ज्यांचा अभिमान गेला । तुका म्हणे देव झाला।। हे तुकोबांचे वचन आवर्जून त्यांनी सांगत असत. प्रत्येक व्यक्तींनी आपल्यातले अज्ञान काढून अंधश्रद्धा पासून दूर राहावे, देव हा दगडात नसून प्रत्येक मनुष्याच्या शरीरात असतो, त्यामुळे भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, पशु पक्षांना मुक्या प्राण्यांना अभय, इत्यादी कार्य करून आपण आपल्या जिवनाचे सार्थक करून घ्यावे असे त्यांनी आपल्या कीर्तनातून लोकांना संबोधन करत असत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नरसिंगराव पोळ सर, ईश्वर पाटील शिंदे, माधव रामराव शिंदे, विनायक बिराजदार, माधवराव गुंडुरे, संजय मंदिलवार व ग्रंथालयाचे सर्व कर्मचारी वाचक उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आभार पुंडलिक कदम यांनी मानले.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या