
🔴 संविधान प्रतिकृती विटंबना निमित्त आज देगलूर बंद ची हाक.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्र. 9923072242
परभणी शहरात भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ संविधान प्रेमी नागरिकांनी शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी देगलूर बंदची हाक देण्यात आली आहे. या अनुषंगाने शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या निषेधामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची समाजकंटकाने विटंबना केली. या घटनेचा देगलूरात विविध सामाजिक संघटना बौद्ध समाज व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने निषेध करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करून शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी देगलूर बंदची हाक पुकारली आहे. शहरातील सर्व छोट्या व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या निषेधामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन संविधानप्रेमी नागरिकांनी केले आहे.















