16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️वात्सल्य वृद्धाश्रम येथे सुमधूर गीतांचा कार्यक्रम आयोजन.

🔴 वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी येथे सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजन. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक प्रतिनिधी : डॉ.शाम जाधव

नाशिक आज दिनांक १६/०९/२०२४ रोजी वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी, पंचवटी, नाशिक या ठिकाणी श्री गणेशोत्सव निमित्ताने कारवा कराओके क्लबचे संस्थापक रिदम शहा आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी आजी आजोबांसाठी सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी जुन्या नवीन गाण्यांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. याप्रसंगी सर्व आजी आजोबांनी या सर्व गाण्यांचा आनंद घेत काही गाण्यांवर ठेका देखील धरला. 

यावेळी वृद्धाश्रमात चैतन्याचे आणि अतिशय आनंदाच वातावरण होतं. वात्सल्य वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सतीश सोनार आणि संपूर्ण स्टाफ यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवत आनंद घेतला. यावेळी वृद्ध आजी, बाबा यांना खूप खूप आनंद झाला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या