15.4 C
New York
Thursday, May 7, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी मारोतराव कवळे गुरुजी हेच खरा नेता अशी नागरिकांतून चर्च.

🔴 नांदेड लोकसभेच्या पोट निवडणुकीसाठी मारोतराव कवळे गुरुजी हेच खरा नेता अशी नागरिकांतून चर्चा. 

शिवगर्जना न्यूज, 

नादेड/प्रतिनिधी निळकंठ जाधव

नांदेड जिल्ह्यातील भाजपासाठी विकासात्मक दृष्टिकोन असलेला एक सक्षम नेता कवळे गुरुजी पुढे होणा-या लोकसभेच्या पोटनिवडणुकी करिता भाजपाला अत्ता उमेद्वार निवडी बाबत फेरविचार करावा लागणार असुन गत निवडणुकीत दुधाने पोळलेल्या पक्षाला अता ताकही फुंकुन पिण्याची वेळ असल्याचे बोलले जात असले तरी यासाठी भाजपाला एक सक्षम पर्यायाची चाहुल लागल्याचे विश्वसनिय माहिती पुढे आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, लोकसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदार संघात भाजपाचा दारुण पराभव करत कांग्रेसने मोठ्या मताधिक्याने बाजी मारली. परंतु कै. खा. वसंतराव चव्हाण यांचा खासदार म्हणुन निवडुन येउन ३ महिन्याचा कालावधी उलटला व काळाने त्यांच्यावर घाव घातला व त्यांच्या प्रकृतीने दगा दिल्याने त्यांचा स्वर्गवास झाला. यात रे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली. रिक्त झालेल्या जागेसाठी भविष्यात पोटनिवडणुक होणार असुन यासाठी भाजपाला एका सक्षम उमेदवाराची गरज असल्याचे भाजपाप्रेमी जाणकाराचे मत आहे

नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजपास सक्षम पर्याय म्हणजे लोकाभिमुख शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजीच होऊ शकतात असे भाजपाच्या एका गोटातुन बोलले जात आहे. कवळे गुरुजी हे एक सर्वसामान्य परंतु नांदेड लोकसभेमधुन भाजपाला ● विजयश्री खेचुन आणनारे असाधारण यशस्वी व्यक्ती ठरु शकतात असे मतदारसंघात चर्चचा विषय बनला आहे.

नायगांव विधानसभा तसेच नांदेड लोकसभा मतदार संघात गुरुजी यांच्या विकास कार्याच्या चर्चेमुळे कवळे गुरुजी संपुर्ण जिल्ह्यातील मतदार संघात सुपरिचीत झाल्याचे अनेकांचे म्हणने आहे. उमरी तालूक्यातील सिधी या गावी एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले श्री. मारोतराव कवळे गुरुजी हे कुठलाही धाडसी निर्णयघेण्याची क्षमता त्यांच्या अंगी असलेल नेतृत्व होय. कवळे गुरूजी हे जिल्हा परिषद निवडुण येऊन उमरी, धर्माबाद व नायगाव तालुक्यातील अनेक गावात विकासाची कामे केले. कारखाना, पतसंस्था तसेच दुधडेअरीच्या माध्यमातुन हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिले. तसेच संपुर्ण नांदेड जिल्यात फिरुन उस पिकाने शेतक-यांचे उत्पन्न वाढवुन देऊन हजारो शेतक-यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले, नादेड जिल्हा सिंचनाच्या बाबतीत कसा सक्षम होईल याचे व्हिजन केवळ कवळे गुरुजी यांच्या कडे असुन भविष्यात खसदारकी च्या माध्यमातुन केंद्र सरकार कडुन सिंचना बाबत ते भरिव कामगीरीची अपेक्षा त्यांच्या कडुन करन जिल्हा सुजलाम सफलाम होण्याची गॅरंटी देता येईल असे हजारो शेतक-यांचे म्हणने आहे. भाजप हा विकास कामे करणा-याव्यक्तीला प्राध्यान्यक्रम देणारा पक्ष असुन अश्या पक्षास विकासाचे व्हिजन असलेला हुशार उच्चशिक्षीत नेता मिळाल्यास सोने पे सुहागा होईल असे बोलले जात आहे.

मारोतराव कवळे गुरुजीचा आज पर्यंतचा राजकीय प्रवास ब-यापैकी असुन नादेड जिल्हा परिषद सदस्य, उमरी बाजार समितीचे उपस भापती, सभापती म्हणून काम केले. विधानसभा निवडणूकही लढवली होती. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवून भाजप पक्षात उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश केले होते. गेल्या लोकसभेला भाजप पक्षाकडुन एकनिष्ठ काम करत नांदेड जिल्हा पिंजुन काढले होते. विकासत्म काम करण्याची पध्दत जणुकाही वेगळीच आहे. स्वच्छ राजकारण सर्वांना सोबत घेऊन जनतेसमोर जाणारे कवळे गुरूजी हे लोकसभेचे विजयाचे शिल्पकार ठरु शकतात असे जनतेतुन चर्चा पुढे येत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या