🔴सौ.कमलबाई श्रीराम पा.अनेराये यांचे निधन.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी निळकंठ जाधव
तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील सौ कमलबाई श्रीराम पाटील अनेराये यांचे अल्पशा आजाराने दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना नातू असा मोठा परिवार आहे.
कमलबाई श्रीराम पाटील अनेराये ह्या अतिशय नम्रता अंगी असलेल्या आणि प्रमाणिकपणाचे जीवन जगलेल्या आहेत अशी त्यांची गावभर ओळख आहे. दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कारा वेळी डॉ.माधवराव विभूते, शिवसेना माधव पाटील कल्याण, संजय पाटील चोंडे, पोलीस कर्मचारी साईनाथ सांगवीकर, संगमेश्वर सावकार, गंगाधरराव पांडे, गादेवार सावकार, दिगंबर झुंजारे, सोनाली ताई हंबर्डे यासह महिला पुरुषासह मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.















