16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️बाबळी व बळेगाव बंधारा बॅक वॉटर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्या.

🔴 बाबळी व बळेगाव बंधारा बॅकवॉटर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्या.

♦️रयत क्रांती संघटना पांडुरंग शिंदे यांची मागणी.

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव

नांदेड जिल्ह्यातील बाबळी बंधाऱ्यामुळे चिरली, कोंठा, गुजरी, कांगठी, खपराळा, कोळगाव इ.आणि बळेगाव बंधाऱ्याच्या बॅक वॉटरमुळे कुंटूर, सांगवी, इज्जतगाव, धनज, मेळगाव, सातेगाव, इकळीमाळ, बळेगाव, हुस्सा, राहेर इ. गावातील शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. बॅक वॉटर मुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने विशेष पॅकेज देऊन उपाय योजना कराव्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेची पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली .

पांडुरंग शिंदे यांनी बॅक वॉटर मुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना शेतकऱ्यांच्या समवेत सांगितल्या.

यावेळी रयत क्रांती पक्षाचे उत्तम वडजे, हनुमंत नरवाडे, संतोष नरवाडे, दिगंबर नरवाडे, बालाजी हिवराळे, कैलास हिवराळे, भुजंग हिवराळे व या भागातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या