🔴 प्रधानमंत्री पिक विमा २०२३ च्या शेतकऱ्यांनी १४४४७ या तक्रार नोंदवून अनुदानाची मागणी करावी, असे आवाहन शेतकरी पुत्र गजानन पा चव्हाण यांनी केली आहे.
शिवगर्जना न्यूज,
नायगांव तालुका ग्रा. प्रतिनिधी :दिपक गजभारे
नायगाव तालुका व नायगाव मतदारसंघतील नांदेड जिल्ह्यासह सर्व ज्या शेतकऱ्याकडे पिकविमा क्लेम केल्याचा Docket ID नाही त्यांनी १४४४७ या नंबर वर फोन लावून २०२३ च्या पिकविमा पावती नंबर व आधार नंबर अकाउंट आय.एफ.सी. कोड नंबर वरील सांगावेत ही प्रोसिजर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये २०२३ चा विमा जमा होईल आणि २०२३ मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी तक्रार केली नाही अशा अनुदान पर २५% विमा मिळाला आहे आणि ७५ टक्के सरसकट देण्यात यावेत कारण महसूल पुरवे जमा आहेत यासाठी शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी न्यायालयात न्याय मागणीची प्रक्रिया चालू आहे,
आमच्या तालुका प्रतिनिधीशी नायगाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण यांना बोलत असताना शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही असे सांगितले.