30 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️नायगाव तालुक्यातील संगणक परिचालक धरणे आंदोलनात २६ ऑगस्ट रोजी मुंबईत सहभाग.

🔴 नायगाव तालुक्यातील संगणक परिचालकांचे धरणे आंदोलनामध्ये २६ ऑगस्ट रोजी मुंबईत सहभाग.

 

▪️संगणक परिचालक संघटना नायगाव तालुकाध्यक्ष गणेश चोंडे यांनी तालुक्यातील सर्व संगणक परिचालकांस आंदोलनात सहभाग नोंदवण्यास केले आवाहन. 

शिवगर्जना न्यूज, 

नायगांव ग्रा. तालुका प्रतिनिधी: दिपक गजभारे

नायगांव : शासनाने अनेक वेळा दिलेले आश्वासन न पाळल्याने मुंबई येथील आझाद मैदानावर बुधवारी २६ ऑगस्ट २०२४ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नायगाव तालुक्यातील अनेक संगणक परिचालक यांनी २५ तारखेला निघुन २६ तारखेला मुंबईत येण्याचे आव्हान नायगाव परिचालक संघटनेने केले आहे.

यावलकर समितीने शिफारस केल्याप्रमाणे ग्रामपंचायतच्या सुधारित आकृती बंधानुसार संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे. जर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यास वेळ लागत असेल तर किमान विस हजार रुपये मासिक मानधन वाढ देणे या दोन प्रमुख मागण्यासाठीच २१ फेब्रुवारीस धरणे आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन हजार रुपयाची वाढ करून एकूण दहा हजार रुपये देण्याचे जाहिर केले. परंतु ग्रामविकास विभागाने जुन महिन्यात जि.आर. निर्गमित केला तो पण संगणक परिचालक यांच्या विरोधात. अगोदर च्या कंपनी चा करार संपुष्टात आणुन आय.टी.महामंडळ यांच्याकडे देण्यात आला. परंतु आय.टी. महामंडळ याने आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प चालविण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

अगोदर च्या कंपनी चा करार संपुष्टात आल्याने नव्याने संगणक परिचालक यांना नियुक्ती करणे गरजेचे होते पण एक जुलै पासुन कोणाचीही नियुक्ती केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच बरोबर मागील कोणतीही मागणी न करता एक प्रकारे छळ च करत असल्याचे संगणक परिचालक बोलून दाखवत आहेत. ना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा दिला ना किमान वेतन लागू केले. त्यामुळे राज्य संगणक परिचालक संघटना यांनी २६ ऑगस्ट पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या अनुषंगाने नायगाव तालुक्यातील संगणक परिचालक यांनी सर्व तयारी निशी मुबंई ला येण्यासाठी संगणक परिचालक संघटनेचे नायगाव तालुकाध्यक्ष यांनी आवाहन केले आहे.

यावेळी संगणक परिचालक तालुकाध्यक्ष गणेश चोंडे, उपाध्यक्ष रामेश्वर पवार, सचिव तिरुपती जाधव, गजानन कदम, पांडुरंग बनसोडे, नागेश जाधव, शैलेश जाधव, गुलाब वानखेडे, दिपक गजभारे, संभाजी पांचाळ, बाजीराव ढगे, आनंदा कदम, हणमंत उपासे, इत्यादी ची उपस्थिती होती. कोणत्याही आश्वासनावर माघार घेण्यात येणार नाही तसेच शासनाने निर्णय दिल्या शिवाय आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही. असा पवित्रा राज्य संघटनेने घेतला आहे.

आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून मागील १२ वर्षापासुन ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक प्रामाणिक काम करत असताना शासनाने संगणक परिचलकांना ग्रामपंचायती च्या सुधारित आकृती बंधात कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागण्या संगणक परिचालकांच्या न करता निधी नसल्याचे मुख्यमंत्री सांगतात तर दुसरीकडे युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत ला डेटा ऑपरेटर म्हणून नियुक्ती देत आहे. हे पद सहा महिन्यासाठी असल्याचे सांगत आहेत तरीही दोन्हीही ऑपरेटर यांच्यामध्ये विनाकारण स्पर्धा होत आहे बोलल्या जाते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या