16.6 C
New York
Thursday, September 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️विज्ञान व तंत्रज्ञान युगाची पावले ओळखून शिक्षकांनी शिक्षण द्यावे — गट शिक्षणाधिकारी

🔴 विज्ञान व तंत्रज्ञान युगाची पावले ओळखून शिक्षकांनी शिक्षण द्यावे– गट शिक्षणाधिकारी कांबळे. 

▪️कोलंबी केंद्राचे केंद्र सम्मेलन आंचोली च्या जिल्हा परिषद शाळेत संपन्न. 

शिवगर्जना न्यूज, 

नांदेड प्रतिनिधी निळकंठ जाधव

तांत्रिक व विज्ञान युगाच्या पावलाची जाणीव ठेऊन शिक्षक मित्रानी आपल्या शाळेची व विद्यार्थी यांची प्रगती करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत यातून विद्यार्थी हा गुगलच्या दुनियेतील असल्याने आपणही तेवढेच सक्षम व आभ्यास पूर्ण शिक्षण देऊन ज्ञान दानाचे कार्य करावे असे प्रतिपादन नूतन गटशिक्षण अधिकारी संग्राम कांबळे यांनी केले कोलंबी केंद्राचे शिक्षण परिषदेत बोलत होते. 

नायगाव तालुक्यातील केंद्र कोलंबी च्या वतीने आयोजित जि.प.प्रा. शाळा अंचोली येथे २० आगॅ. रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली. सदर केंद्र संम्मेलन जि.प.प्रा.शाळा अंचोली व जि.प.प्रा.शाळा नरंगल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे प्रमुख अतिथी तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून संग्राम कांबळे गट शिक्षणाधिकारी पं.स.नायगाव हे होते. या कार्यक्रमास राजेश्वर डोमशेर (केंद्रीय मु.अ.तथा केंद्रप्रमुख केंद्र- कोलंबी), बाळसाहेब पांडे (ज्येष्ठ पत्रकार), उप सरपंच प्रतिनिधी अशोक पाटील मोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ता पाटील मोरे, नरंगल सरपंच पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य बालाजी विठ्ठलराव मोरे याची उपस्थिती होती. कार्यक्रमास सुलभक महेंद्र बुद्धपा, त्र्यंबक स्वामी, धम्मदीप गायकवाड, गोपतवाड, रुपेश गाडे वाड या शिक्षकाची विशेष उपस्थीती होती.

यावेळी आंचोली शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर स्वागत गीत गायीले. आंचोली जि.प. शाळेला गत वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा तालुका स्तरीय पुरस्कार मिळताना आलेल्या आडच्णी या विषयी मार्गदर्शन मू.अ. उत्तम गायकवाड यांनी केले. त्र्यंबक स्वामी, बुधपा सर, धम्मदिप गायकवाड, गोपत्वाड सर,यांनी तासिका घेऊन यावर माहिती दिली भविष्य वेधी शिक्षणातील टप्पे शाळेत राबवत असलेले उपक्रम या विषयी रुपेश गाडेवाड सर यांनी सविस्तर माहिती दिली

यावेळी केंद्राचे मू. राजेश्वर डोमशेर, बाळासाहेब पांडे यांनी मार्गदर्शन केले. संचलन नरगल शाळेचे मूख्या. माधव मोरे यांनी तर आभार गोपत्वाड ने मानले. कार्यक्रम यशस्विते साठी आडबलवार मॅडम, मिराशे सर, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. यावेळी सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या