🔴 सर्व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आसूड मोर्चा मध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे — गजानन पाटील चव्हाण यांचे सर्व जनते सह शेतकरी यांना आव्हान.
शिवगर्जना न्यूज,
नायगांव ग्रा. तालुका प्रतिनिधी
दिपक गजभारे
नायगाव मतदारसंघासह तालुक्यातील राज्यातील शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मेटाकुटीला आलेला आहे सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचे मरण ठरले आहे ज्या राज्यकर्ते जातीपाती व धर्माधर्मांमध्ये सामान्य जनतेचे भांडणे लावून शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे.
यामुळे नायगाव तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व शेतकरी पत्रांनी सर्व राजकीय झेंडे बाजूला ठेवून व जाती भेद बाजूला ठेवून शेतकरी शेतमजूर व शेतकरी पुत्रांनी सरकारचे लक्ष आपल्या मागण्याकडे घ्यावे. यासाठी शेतकरी शेतमजूर समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक १० वा. डॉक्टर हेडगेवार चौकातून नायगाव तहसील कार्यालय येथे जनहितार्थ आसूड मोर्चा काढायचे ठरले आहे.
या मोर्चामध्ये पुढील मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत.
(१) ई -पिक पाहणी नोंद सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा.
(२) तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करा.
(३) किसान सन्मान योजना सातबारा शेतकऱ्यांच्या नावावर आहे त्या सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू करावी.
(४) शेतकऱ्यांना कोणतेही कर्ज देताना सिविल अट रद्द करावी.
(५) स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसी नुसार शेतमाला खर्चाच्या दीड पट भाव देण्यात यावा वन प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि वन्य प्राण्यामुळे शेतीचे जे नुकसान झालेले आहे ती भरपाई तात्काळ शेतकऱ्याने देण्यात यावी.
आसूड मोर्चा ची जन मागणी करण्यासाठी नायगाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेतृत्व शेतकरी नेते गजानन पाटील चव्हाण, रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग पाटील शिंदे, किसान ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर दत्ता पाटील मोरे, शेतकरी पूत्र नेते श्याम पाटील वडजे, छावा संघटनेचे युवा अध्यक्ष राजेश मोरे, सह विविध कार्यकर्ते या सर्वांनी गाव निहाय गावा गावात भेटी घेऊन शेतकरी बांधवां सोबत संवाद साधून त्यांच्या मागण्याची व भावनेची बाब लक्षात घेऊन संवाद साधण्यात आला. तसेच सर्व शेतकऱ्यांना आसूड मोर्चा येण्याचे निमंत्रण शेतकरी बांधवांना देण्यात आले तसेच सर्व शेतकरी बांधवांना आपल्या शेती विषयक असलेले अवजारे ट्रॅक्टर, बैलगाडी, नांगर, मुळकी, चाबूक आणि स्वतःच्या पोटासाठी भाकर चटणी व पाणी बॉटल सोबत घेऊन यावेत असे शेतकऱ्यांना संवाद बैठकीमध्ये सर्वांना सांगण्यात आले. ठीक २२ /०८/ २०२४ रोजी सकाळी १० दहा वाजता सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान शेतकरी पुत्रांनी केले आहे.