20.7 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️एक दिवस देशासाठी ज्ञानाई काव्य महोत्सव संपन्न.

🔴 एक दिवस देशासाठी ज्ञानाई काव्य महोत्सव संपन्न. 

शिवगर्जना न्यूज, 

पूणे प्रतिनिधी : जगदीप वनशिव 

पुणे- येथील ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेच्या वतीने एक दिवस देशासाठी या शीर्षकाखाली भव्य काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे अध्यक्ष प्रा.संदीप चोपडे सचिव सावित्रीबाई फुले ज्ञान प्रबोधिनी पुणे प्रमुख पाहुणे प्रा. दशरथ दुनघव प्रा. प्रीती भालेराव प्रा.दत्तात्रय चव्हाण प्रा.विजय पैठणे संस्थापक अध्यक्ष लोक कवी सीताराम नरके ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड गीतकार गायक छगन वाघचौरे हे मान्यवर उपस्थित होते.  स्वागत गीत सादर करून मान्यवरांच्या शुभ हस्ते संविधान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला काव्य महोत्सवाचे प्रास्ताविक सीताराम नरके यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ भारतीय संविधान ग्रंथ देवून सन्मानित करण्यात आले. 

काव्य महोत्सवात सहभागी विविध क्षेत्रातील महिला पुरुष यांनी हजेरी लावली जनाबापू पुणेकर, रामचंद्र गुरव, राहुल भोसले, ॲड. क्षितीज खरात, साधना शेळके, तानाजी शिंदे, आत्मराम हारे, डॉ. बळीराम ओहोळ, यूसूब पठाण साजन, पिलाणे विजय सातपुते, देवेंद्र गावंडे, अशोक शिंदे, शाम लाटकर, सुभाष गवळी, दिनेश गायकवाड, विकी कांबळे, पांडुरंग म्हस्के, जयवंत अवघडे, पल्लवी राऊत यांनी कोहिनूर हिरा, देशप्रेम वर्दी, माझी शहदत्त बलिदान क्रांतीचा एल्गार, वशिला मी तिरंगा बोलतोय, मला प्रश्न पडतो एक दिवस देशासाठी, सह्याद्रीच्या कुशीत प्रहार माझे देशप्रेम, अघटीत क्रांती संविधान अशा विविध विषयांवर कविता सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली गायक, गीतकार, कवी, संगीतकार हजर होते. काव्य महोत्सवाचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी केले. 

काव्य महोत्सवात एक अनोखा उपक्रम राबविला सावित्रीबाई फुले ज्ञान प्रबोधिनी पुणे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहा बक्षिसे काढली संविधान भेट दिली. प्रिया नप्ते, दतू ठोकळे, योगिता कोठेकर, अरूण कांबळे, डॉ. गणेश पुंडे, जनाबापू पुणेकर यांना देण्यात आली. सहभागी कवीना सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भव्य दिव्य काव्य महोत्सव एक खाकी वर्दीतला माणूस लोककवी सीताराम नरके व मार्गदर्शन करणारे निवेदक रानकवी जगदीप वनशिव प्रा. संदीप चोपडे यांनी आयोजन केले होते. 

अध्यक्षस्थानी असलेले प्रा.संदीप चोपडे यांनी सांगितले समाज प्रबोधन करणारी मार्मिक वैचारिक माणसे दुर्मिळ झाली आहेत देशात आजरकता निर्माण झाली असली तरी तरूण पिढीने आपली भूमिका स्पष्ट केली तरच देशात विकास व विचारांचा प्रकाश पडेल. काव्य महोत्सव अनेक विषयांवर कविता सादरीकरण करून कवीचे देशप्रेम ऐकून मी भारावून गेलो आहे मला ही या महोत्सवाचे अध्यक्ष केले हे माझे मी भाग्य समजतो. 

ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या काव्य महोत्सवातील सर्व मान्यवरांच्या मी ऋणानुबंधात राहू इच्छितो. लोक कवी सीताराम नरके यांची सावली असणारे रानकवी जगदीप वनशिव चंद्रकांत जोगदंड व इतर मान्यवरांच्या सहवासात आजचा दिवस मला माझ्या स्मृतीत कोरला गेला. येथून पुढे मी आणि माझी संस्था सावित्रीबाई फुले ज्ञान प्रबोधिनी पुणे व ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही देत आशावाद व्यक्त केला. 

आभार प्रदर्शन मच्छिंद्र नरके यांनी केले राष्ट्रगीताने काव्य महोत्सवाची सांगता झाली पुणे ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेच्या सभागृहात सोहळा संपन्न झाला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या