🔴 डॉ संदीप विनायक काकड यांना वंजारी समाजरत्न पुरस्कार प्रदान.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक जि. प्रतिनिधी : डॉ. श्याम जाधव
नाशिक : वंजारी पुरस्कार प्रधान करण्यात आला रुद्रा समुपदेशन केंद्र चे संचालक तथा व्यसन मुक्ती व मधुमेह मुक्ती केंद्र मखमलाबाद चे संचालक डॉ. संदीप विनायक काकड यांना वंजारी समाजरत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. आध्यात्मिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन व विविध संस्था वर पदाधिकारी असताना उत्कृष्ट समाज सेवक म्हणून कार्य करत आहे. जसे राधिका फौंडेशन- कार्याध्यक्ष, कर्तव्यदक्ष फौंडेशन- पदाधिकारी, पोलीस मित्र परिवार समिती – नाशिक जिल्हा सचिव समर्थ सोशल फौंडेशन – वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अशा अनेक मार्गातून त्यांच्या हातून निःस्वार्थ समाजसेवा घडत असते. व्यसनमुक्ती व आध्यत्मिक मार्गातून अनेक विस्कळीत झालेली कुटुंब व व्यक्तींना समुपदेशन व उपचार पद्धतीने त्यांचे जीवन योग्य मार्गांवरून आणले, खुलविले आहे तसेच आध्यत्मिक प्रबोधन व हिलर च्या माध्यमातून जनसेवा करत असतात.
याचीच दखल घेऊन न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था व श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी नाशिक यांच्या संयुक्त विध्यमाने पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज, वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे आध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, प्रमुख पाहुणे मा. महादेवजी जानकर यांच्या हस्ते पुरस्कार चे वितरण करण्यात आले. यावेळी बाळूमामा मालिका दिग्दर्शक आकाश खेडकर, जय भगवान संघटनेचे आध्यक्ष बाळासाहेब सानप, संकेत सानप महाराष्ट्र राज्य मंत्रालय प्रतिनिधी, भा.ज.पा. दिव्यांग नाशिक जिलाध्यक्ष तथा आयोजक बाळासाहेब घुगे, रंगनाथ दुरगुडे, यमुनाताई घुगे व क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था चे नव निर्वाचित पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.