🔴 रिसनगाव ता.लोहा येथील दिव्यांगाचे वडीलो पार्जित वन जमिनीवर असलेल्या घराची व शेतीतील पिकांची वनपरिक्षेत्र मंडळ लोहा यांनी डोझर ने नासाडी करताना दिव्यांग विनवणी करत रोखण्यासाठी पुढे येताच. दिव्यांगास केली मारहाण तक्रार केल्या वेळी सह पोलिस निरिक्षक माळाकोळी यांनी संबंधितांना दिव्यांग कायदा प्रमाणे गुन्हा नोंद न करता एन.सी.आर. ची केली नोंद.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :
लोहा तालुक्यातील रिषणगाव येथील दिव्यांग असलेल्या चांदु देवराव गोरटकर यांच्या वडीलो पार्जित वन जमिनीवर वन हक्क कायदा २००६ अंतर्गत वैयक्तिक वन हक्क दावेदाराचे अतिक्रम निष्कासित न करण्याबाबत दि.२० जुन २०२४ ला मा.जिल्हा अधिकारी नांदेड यांचे लेखी आदेशाची वनपरिक्षेत्र मंडळ लोहा यांनी लेखी आदेशाची केराची टोपली दाखऊन दिव्यांगाचे वडीलो पार्जित वन जमिनीवर असलेल्या घराची व शेतीतील पिकांची वनपरिक्षेत्र मंडळ लोहा यांनी डोझरने नासाडी करताना दिव्यांग विनवणी करत रोखण्यासाठी पुढे येताच दिव्यांगास केली मारहाण तक्रार सह पोलिस निरिक्षक माळाकोळी यांना दिव्यांगानी दिल्यानंतर तिनं वेळा चकरा मारून तिन दिवसां पासून गुन्हा संबंधितांना होत नसल्यामुळे दिव्यांग बांधव यांनी दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांना फोनवर माहिती देताच डाकोरे पाटील यांनी सहपोलिस निरिक्षक माळाकोळी यांना दिव्यांगाची तक्रार घेऊन संबंधितास कायदा प्रमाणे गुन्हा नोंद का करत नाही असे म्हणताच दोषिवर गुन्हा दिव्यांग कायद्याप्रमाणे न करता एन.सी.आर.ची नोंद केली. मा.ऊप वनसंरक्षक वन विभागाना नांदेड यांना दि.२० जुनं २०२४ जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिलेले पत्र
२) शासन परिपत्रक, आदिवासी विकासविभाग,क्रं.याचिका२०१६/प्र.क्र.१२४/का-१४ दि.१०/२०२२/प्र.क्र.२४३/फ-३ दि.२८ नोव्हेंबर २०२२
या. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाची पायमल्ली करून एका हाताने एका डोळ्याने अंध ६०% टक्के दिव्यांग श्री चांदु देवराव गोरटकर, यांचे वडीलो पार्जित रिषणगाव येथील गट क्र.९६७ मध्ये २ हेक्टर वन जमिनीवर वडीलो पार्जित जमीन असुन व कुटुंबाचा उदर निर्वाह चालवत असताना व मा.जिल्हा अधिकारी नांदेड यांनी मा. ऊप वनसंरक्षक वनविभागाना नांदेड यांना दि.२० जुनं २०२४ रोजी लेखी आदेशात फक्त संदर्भ क्रं.०२ चे शासन परिपत्रका नुसार दाखल प्रकरणात अंतिम निर्णय होई पर्यंत दावेदाराच्या ताब्यातील वन जमिनींचे अतिक्रमण निष्कासित करण्यात येऊ नये. असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांचे असुन सुद्धा वन विभागाकडुन फक्त नमुद दाावेदार ताब्यातील वन जमिनीवरील राहाते घर काढुन त्यातील लाकडे व घरातील वस्तू शेजारच्या गावी हरनवाडी ता. लोहा येथे टाकुन दिले असे करु नका माझे वडील वयस्कर ऐंशी वर्षांचे मी दिव्यांग साठ वर्षांचा पत्नी दिव्यांग, मुलं, सुना, नातु, तसेच शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी असा परिवार त्या झोपडीत राहतेे वेळस पाऊस चालु असतांना दिव्यांग, वृध्द, कुटुंबाचा, गुरे, जनावरांचा विचार न करता दिव्यांगाचा मोबाईल हिसकावुन घेऊन मारहान करून माझे घर व शेतीतील पिकांची डोझर ने काढून मला त्रास दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी भर पावसात वन परिक्षेत्र मंडळ लोहा पथकांनी फक्त दिव्यांगावरच अन्याय केल्यामुळे, दिव्यांगाच्या कायदा २०१६ प्रमाणे गुन्हा नोंद केला नाही.
रिसनगाव येथील वन जमिनीवरील अनेक जनाचे शेती जमीन कब्जेदार असताना गावातील फक्त एका दिव्यांग अकुशल शक्ती हिन असल्यामुळे माझे एकाचेच शेतातील घर व पेरलेले पिक जमिनधोस्त डोझरने करून दिव्यांगास, मारहाण केल्याप्रकरणी व सध्या माझे राहाते शेतातील घर उध्वस्त केल्यामुळे माझे कुटुंब ताटपत्रित राहातं असल्यामुळे भरपावसात होत असलेल्या त्रासाची त्वरीत चौकशी करून दोषींवर कठोर दिव्यांग कायद्या प्रमाणे कडक कार्यवाही करूंन दिव्यांगाना न्याय द्यावा अशी विनंती अर्ज मा.जिल्हाअधिकारी नांदेड, मा.उपविभागीय अधिकारी साहेब कंधार यांना निवेदनाद्वारे अन्यायग्रस्त रिसनगाव येथील चांदु गोरटकर यांनी केली असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.