25.9 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️येरगी येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा “बालिका पंचायत ने केला ध्वजारोहण”.

🔴 येरगी येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा “बालिका पंचायत ने केला ध्वजारोहण”

देगलूर प्रतिनिधी :  (९९२३०७२२४२) 

देगलूर – तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी येथे ७८ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांची संपूर्ण गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली. देश भक्तीच्या विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

विद्यार्थ्यां बरोबर सरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य, बालिका पंचायत राज समिती, महिला बचत गट व गावकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तीन दिवसीय ध्वजारोहण कार्यक्रमात १३ ऑगस्ट व १४ ऑगस्ट रोजी बालिका पंचायत राज ला ध्वजारोहण करण्याचा सन्मान मिळाला.

१३ ऑगस्ट रोजी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे बालिका पंचायत राज समिती चे सरपंच अंजली वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालिका पंचायत राज समिती चे सचिव महादेवी दाणेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर १४ ऑगस्ट रोजी बालिका पंचायत राज चे उप सरपंच पूनम सूर्यवंशी आणि पोलीस पाटील अनिता बागेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण करण्याचा सन्मान प्राप्त झाल्यामुळे बालिका पंचायत राज समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व त्यांच्या पालकांना खूप आनंद झाला.

१५ ऑगस्ट रोजी शाळेतील विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर गीतावर लेझिम नृत्य सादर करून काळजाचा ठेका चुकवला.

झेंडा वंदन झाल्या नंतर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभक्तीपर गीतांवर नृत्य देश भक्ती पर गीत गायन स्पर्धा, भाषण स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.

कार्यक्रमास सरपंच संतोष पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अशोक देवकत्ते, सर्व शिक्षक, ग्रामसेवक राजेश तोटावाड, ग्राम पंचायत सदस्य, बालिका पंचायत राज समिती सरपंच अंजली वाघमारे, उपसरपंच पुनम सुर्यवंशी, ग्रामसेवक महादेव दाणेवार, ग्रामपंचायत सदस्य शिवकांता भुरळे, रोहिणी दाणेवार, सपना काळीगवार, महादेव गादगे, महादेव गोशट्टी, श्रीदेवी धाकपाडे, रूद्राणी चैडके, आश्विनी पांचाळ, स्वाती बरसमवार, तंटामुक्त अध्यक्ष शिवाणी मठपती, पोलिस पाटील अनिता बागेवार, सर्व पदाधिकाऱ्यांचे पालक उपस्थित होते. आपल्या मुलींच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा होत असताना पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.

बालिका पंचायत च्या माध्यमातून ही श्रेष्ठ संधी मिळाल्याने बालिका पंचायत राज समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मीनल करणवाल मॅडम यांचे आभार मानले. या बरोबरच पालकवर्ग व गावातील बहुसंख्य नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या