🔴 महेंद्र भारती यांना समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
पूणे प्रतिनिधी : जगदीप वनशिव
पुणे – येथील विश्वकर्मा सोशल वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने या वर्षी देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार हा धम्म प्रसार करत समाजात परिवर्तनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून, समाजातील जडण घडण करणारे नामांकित असणारे आर्थिक सल्लागार लोक शिक्षक बाबा भारती यांचे सुपुत्र महेंद्र भारती यांना समाज भूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी विचार पीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ. प्रशांत साठे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे मनोगत व्यक्त करतांना महेंद्र भारती म्हणाले, परिवर्तन घडवून आणले तरच खरी प्रबोधन सेवा जतन होईल असे वाटते सामाजिक बांधिलकी जपत असताना सामाजिक बदल घडत असतात. समाजाचे हिताचे काम करणे हेच एक ध्येय आहे माझ्या वडिलांचा वारसा जपून विचारांचा आरसा नक्कीच स्वच्छ असेन. माझ्या आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले असून मला जबाबदारी पुणे समाजसेवक म्हणून काम करायचे आहे. मी नक्कीच समाज प्रबोधन क्रांतीकारक करणे अशी खात्री देतो असे प्रतिपादन केले.
या सभागृहात संस्थेचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुरूषोत्तम सदाफुले अध्यक्ष महाराष्ट्र कामगार परिषद तसेच संत चोखा मेळाचे वंशज सुप्रसिद्ध गायक लेखक राम सर्व गोड सामाजिक कार्यकर्ते जयवंत भोसले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक रान कवी जगदीप वनशिव माजी सरपंच अरूण गराडे डॉ. भीम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक शालेय विद्यार्थीचा गुणवत्ता प्राप्त गुणीचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा पुणे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ पुणे संपन्न झाला.