25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️सकल हिंदु समाजाच्या वतीने नायगाव बाजार पेठ कडकडीत बंद.

🔴 सकल हिंदु समाजाच्या वतीने नायगाव बाजार पेठ कडकडीत बंद.

शिवगर्जना न्यूज, 

नायगाव तालूका ग्रा. प्रतिनिधी

दिपक गजभारे

धार्मिकतेच्या आधारावर बांगलादेशात हिंदूना लक्ष करुन लैंगिक अत्याचार करण्यात तर येतच आहेत पण हिंदू मंदिराची मोडतोड करण्यात येत आहे. या प्रकारच्या निषेधार्थ हिंदू समाजाच्या वतीने दि.१७ ऑगस्ट रोजी नायगाव बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला नायगाव शहरात व तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध नोंदवला. बांगलादेशात झालेल्या उठावानंतर तेथे मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या असून यात जिहादी धर्मांधांकडून धार्मिक हिंसाचार करण्यात येत आहे. धार्मिकतेच्या आधारावर तेथील हिंदूना लक्ष्य करून त्यांचेवर अतोनात अत्याचार सुरू आहेत. इतकेच नाही तर हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड तसेच हिंदू देवी देवतांची विटबंना केली. या हिंसाचारात जिहादच्या नावाखाली हिंदू महिलांवर दिवसाढवळ्या बलात्कार तसेच त्यांच्या शरिराचे लचके तोडले गेले. त्यांच्या अंगावरील कपड्यांचे देखील अतिशय घाणेरड्या स्वरूपात प्रदर्शन करीत असल्याचे लाजिरवाणे दर्शन घडले आहे. हिंदूना मारून त्यांची प्रेते भर चौकात लटकविले असल्याचे विभस्त चित्र आपणास दिसत आहे. हे प्रकार तेथील जिहादी संघटना व समुदाय घडवून आणत असल्याचे स्पष्ट आहे. बांग्लादेशात खुप मोठ्या प्रमाणावर धर्माच्या नावाखाली हिंदूचा नरसंहार सुरू आहे. सकल हिंदूनी ही बाब अत्यंत गांर्भीयाने घेणे गरजेचे आहे. 

या सर्व हृदय द्रावक पाशवी हिंसाचाराचा व अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व हिंदू एकतेचा संदेश देण्यासाठी दि.१७ ऑगस्ट २०२४ रोजी शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती. सकल हिंदू समाजा च्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यानी विशाल मोर्चा काढून बांग्लादेश येथील सर्व घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या