11.6 C
New York
Saturday, April 11, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️वात्सल्य वृद्धाश्रम सामूहिक आजी बाबांचा जन्मदिवस साजरा.

🔴 वात्सल्य वृद्धाश्रम सामूहिक आजी बाबांचा जन्मदिवस साजरा. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक जिल्हा प्रतिनिधी : डॉक्टर श्याम जाधव

नाशिक : दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आजी-आजोबांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी वृद्धाश्रमाचे देणगीदार, मान्यवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्याच प्रमाणे वात्सल्य हे गेल्या अनेक वर्षा पासून हा उपक्रम राबवत असल्याने या दिवशी आजी-आजोबांचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच असतो. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून श्री श्याम लोंढे, श्री अमित कुलकर्णी, सौ.लता दिनकर पाटील, सौ.ज्योती कटाळे, स्वामीनारायण मंदिराचे महंत स्वामी दिव्यनयन महाराज, श्री निलेश गुरनानी, महानुभाव पंथाचे श्री मराठे बाबा, नगरसेविका हर्षदा गायकर, डॉ.प्रियंका पाटील, पूजा गवळे, डॉ. देविदास सोमवंशी, आणि इतर देखील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार करून त्यांनी आपली मनोगत देखील याप्रसंगी व्यक्त केली, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी विशेष बाब म्हणजे नाशिक मधील प्रसिद्ध गायक सूत्र संचालक संतोष फसाटे आणि त्यांची सर्व टीम यांनी या ठिकाणी सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम संपन्न करत आजी-आजोबांना भरपूर आनंद दिला. याप्रसंगी आजी-आजोबांना काही देणगीदारांनी यथा योग्य नाष्टा गिफ्ट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात, कार्यक्रमासाठी कीर व रोचवानी परिवार, विवेक परदेशी, चिमण साधवानी यांचे विशेष 

सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष सतीश सोनार, योगेश पिंपळगावकर आणि संपूर्ण स्टाफ यांनी यावेळी मेहनत घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या