16.9 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत नगर परिषद उमरी यांच्या वतीने भव्य उमरी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न.

🔴भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त व हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत नगर परिषद उमरी यांच्या वतीने भव्य उमरी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. 

शिवगर्जना न्यूज, 

उमरी तालुका प्रतिनिधी : महेश पडोळे

भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त व हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत नगर परिषद उमरी यांच्या वतीने भव्य उमरी मॅरेथॉन स्पर्धेचे दिनांक १४/०८/२०२४ रोजी आयोजन करण्यात आले असुन सदर स्पर्धा सकाळी ०७:०० वाजता मोंढा येथुन सुरुवात होऊन कारेगाव पॉईंट ते चिंचाळा पाटी जवळ ते परत त्याच मार्गाने कै.गिरीषभाऊ गोरठेकर सभागृह पर्यंत ०५ कि.मी.अंतराची मॅरेथॉन स्पर्धेस श्रीमती दाभाडे मॅडम यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये उप विभागीय अधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे, तहसिलदार श्री.प्रशांत थोरात, पोलीस निरिक्षक श्री अंकुश माने, मुख्याधिकारी निलम कांबळे यांचेसह, विविध भागातील विद्यार्थी तसेच, उमरी शहरातील पत्रकार, जेष्ठ नागरीक व इतर गावातील स्पर्धकांचा समावेश होता. 

स दरील स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या स्पर्धकास रु.७०००/-, द्वीतीय- ५०००/- व तृतीय ३०००/- व सन्मानचिन्ह असे पारितोषिक ठेवण्यात आले होते. या स्पध्येचे बक्षीस वितरण कै.गिरीषभाऊ गोरठेकर सभागृह उमरी येथे सकाळी ०८:०० वाजता संपन्न झाले असुन त्यावेळी उप विभागीय अधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे, तहसिलदार श्री.प्रशांत थोरात, पोलीस निरिक्षक श्री.अंकुश माने यांचे सह उमरी नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांच्या हस्ते दिप ज्योत प्रज्वलीत करुन बक्षीस वितरणास सुरुवात करण्यात आली. मॅरेथॉन या स्पर्धेमध्ये श्री.माधव तुकाराम मैनतकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर श्री.शंकर चक्रधर इंगोले यांनी द्वीतीय व श्री.सुर्यकांत माणिका गोबलवाड यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच मुलींमध्ये कु.शिवकुमारिका संतोष पुदलवाड यांनी प्रथम व कु.वैष्णवी लोकडेश्वर कस्तुरे यांनी द्वीतीय व कु.वैष्णवी बालाजी मदनवाड यांनी तृतीय क्रमांक मिळविला असुन यासह टॉप १० मध्ये १० स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देण्यात आले. तसेच स्वातंत्र्य सैनिक यांचे वारसदार श्री.सुभाष पेरेवार, श्री.शंकर माने यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी पत्रकार बी.व्ही.चव्हाण, कैलास सोनकांबळे, शेख आर‍िफ, शहरातील नागरीक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 

उमरी शहरामध्ये प्रथमच नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने येथील मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यामध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता करण्यात आली व बक्षीस वितरण वेळी स्वच्छतेत जागरूक असणाल्या भगिनी सौ.गौरीताई लापशेटवार यांचा सन्मान करण्यात आला. सदरील स्पर्धा यशस्वी करण्याकरीता नगरपरिषद अभियंता श्री.संतोष मुंढे, लेखापाल श्री.ज्योतीराम जाधव, संगणक अभियंता श्री.विनोद सावंत, कार्यालय अधिक्षक श्री.गणेश मदने, श्री.एस.वाय. पिंडकुरवार, श्री.सचिन गंगासागरे, शकीलखॉन पठाण, श्री.गायकवाड पी.एम.,सुर्यकांत माळवतकर, शंकर पाटील, रमाबाई करपे, चंद्रकांत श्रीकांबळे, शंकर माने, गंगाधर पवार, नरेंद्र खंदारे, आकाश खंदारे, अंकुश सवई, चंद्रप्रकाश मदने, माधव जाधव, दिपक पोलशटेवार, हमीद बेग, सुनंदा खंदारे, बालाजी खंदारे, मिलींद सवई, साईबाबा सरदुला, शमीम बेग, व्यंकटी गोरे,संदीप सवई, विनोद बनसोडे, अविनाश बनसोडे, चंद्रप्रकाश पवार, शुभम मुदीराज, सदानंद गायकवाड, यांचे सह सर्व नगरपरिषद कर्मचारी/घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळ्याचे सुत्रसंचलन कार्यालय अधिक्षक श्री गणेश मदने यांनी केले तर आभार श्री गंगाधर पवार यांनी मांडले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या