🔴 पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे, सार्वजनिक वाचनालय मानव सेवा केंद्र (मायको हॉल)
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
नाशिक दि.१०/०८/२०२४ शनिवार सायंकाळी स्टेडियम शेजारी सिंहासन नगर सिडको नाशिक येथे मासी खुले कवी संमेलन संपन्न झाले. कविवर्य नारायण सुर्वे कवी कट्टा च्यावतीने मासिक खुले कवी संमेलनचे स्वागाध्यक्षपदी डॉ.चिदानंद फाळकेयांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.भाषणात म्हणाले कविता ही प्रतिभावंत असते. कवितेला आकार, आशय, विषय, असावा लागतो म्हणजे कविता प्रतिभावंत होते. कविता ही मना मध्ये उचांबळून यावा लागते. ती प्रतिभा काही जणांचं प्राप्त होते. तेच प्रतिभावंत कवी होऊ शकतात.
एखाद्या मूर्तिकार प्रमाणे कविता घडवावी लागते. अशा या खुले कवी संमेलना घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे कवी रविकांत शार्दुल सर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी खुले कवी संमेलन आयोजित केले जात असते .
पार पडलेल्या कवी संमेलनात रमेश चौधरी, माणिकराव गोडसे, डॉ.अशोक पगारे, राजेंद्र देसले, मधुकर गिरी, वसंत चव्हाण, मोहन पाटील, अँड.सुकन्या महाले, ओम प्रकाश शर्मा,नगमापरविन अन्सारी, सुशीला पिंपरीकर, नर्गिसपरवीन अन्सारी, सुभाष उमरकर, भाऊराव साळवे, सुहास टिपरे, डॉ.प्रशांत आंबरे,भूपाल देशमुख, समाधान खैरनार, शिरज शिरसाट, रेखा सोनवणे, मगनलाल बागमार, डॉ.शकुंतला चव्हाण, गोकुळ वाडेकर,अलका कुलकर्णी, योगेश जाधव, अण्णासाहेब बडाख, सुभाष शेलार याप्रसंगी कवी प्रेमिक नाशिक मधून नाशिकच्या आजूबाजूंनी मोठ्या संख्येने सहभाग करून पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या कवी संमेलनात मोलाची भर देऊन हे संमेलन अतिशय हात वरती आणि मानले जाणारे होयअदी कवींनी कविता सादर केल्या.या खुले कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ अंजली भंडारी यांनी अतिशय उत्कृष्ट केले व सर्वांचे आभार मानून कवी शार्दुल सरांनी कवितेने संमेलनाची सांगता केली.