16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️चैनपुर ग्रामपंचायत वतीने १५ ऑगस्ट पूर्वतयारी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

 

🔴 चैनपुर ग्रामपंचायत वतीने १५ ऑगस्ट च्या पूर्वतयारीसाठी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

शिवगर्जना न्यूज, 

ग्रामीण ता. प्रतिनिधी : हानमंत कदम 

देगलूर : चैनपूर ग्रामपंचायत च्या वतीने १५ ऑगस्ट पूर्वतयारीसाठी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये अनेक वर्षा पासून नालीची साफसफाई वरवर माणसाच्या आधारे काढण्यात आली होती परंतु यंत्राच्या साह्याने छोटी जे.सी.पी. नांदेड येथून बोलावून पूर्ण नाली सफाई काम करण्यासाठी सरपंच, उप सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन कामाची सुरुवात करण्यात आली. गावात सर्वत्र दिवाबत्ती करणे, पाणी पुरवठा करणे व नाले सफाई करणे आरोग्याच्या दृष्टीने श्रावण महिन्या मध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात आले त्या प्रसंगी उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व सहकारी बहु संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या