16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️आंतरराष्ट्रीय स्तरावर अण्णा भाऊ नी मराठी साहित्याची पताका फडकविली.

🔴 आंतरराष्ट्रीय स्तरावर अण्णा भाऊ नी मराठी साहित्याची पताका १९५० च्या दशकात फडकविला.

शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी

बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारे तथा सामाजिक वास्तवाची प्रखर जाणीव असणाऱ्या क्रांतिकारी साहित्यक अण्णा भाऊ साठे होते. महामानव साठे यांनी जीवनासाठी कला या अनुषगाने आपली साहित्य संपदा निर्माण केली. तसेच समाजातील दीन, दलित, वंचित, कष्टकरी, स्त्रिया, भटके यांच्या व्यथा वेदना साहित्यातून अण्णाभाऊ साठे यांनी मांडले वआंतरराष्ट्रीय स्तरावर अण्णा भाऊ नी मराठी साहित्याची पताका १९५० च्या दशकातच फडकविला. असे प्रतिपादन आ. जितेश अंतापूरकर यांनी केले.

यावेळी माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, मा. नगराध्यक्ष शंकरराव कंतेवार, माजी
आ. जितेश अंतापूरकर
नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, जनार्धन बिरादार, नांदेड जि.प. स्विकृत सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर, मच्छिंद्र गवाले, भाटापूरकर, चंद्रकांत घाटे, निवृत्ती कांबळे, धोंडीबा कांबळे, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार, भा.ज.पा. सह विविध पक्षातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांसह तरूण वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान देगलूर तालुक्यातील अनेक गावात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या उत्साहाने पार पाडले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या