
🔴 गंगाधर महाराज स्वामी खैरगावकर यांच्या वतीने बेलाच्या वृक्षलागवड.
शिवगर्जना न्यूज,
नायगांव प्रतिनिधी: दिपक गजभारे
नायगाव शहरातील पशुपतीनाथ मंदिराचे पुजारी तथा सामाजिक कार्यकर्ते श्री गंगाधर स्वामी महाराज खैरगावकर यांच्या वतीने आज दिनांक २७ जुलै रोजी वृक्ष लागवड करण्यात आली यात त्यांनी महादेवास प्रिय असलेल्या बेलपत्री वृक्षाची लागवड केली श्री गंगाधर स्वामी महाराज हे गेल्या अनेक वर्षापासून नायगाव शहरातील ठिक ठिकाणच्या धार्मिक मंदिरात पूजा आरती अभिषेक आदी ते करतात. त्यांच्या हातून अनेक उत्तम व समाज उपयोगी, राष्ट्र उपयोगी कार्य होत असते. त्यांनी पहाटे दोन पासून पूजा आरतीत मनोभावे मग्न असतात. त्यांनी सतत समाज उपयोगी काही ना काही उपक्रमे राबवीत असतात. त्यांचाच एक भाग म्हणून आज त्यांनी वृक्ष लागवड केली या वृक्ष लागवडीमुळे बेल भक्तांना उपलब्ध होईल असा मानस बाळगून त्यांनी बेल या वृक्षाची लागवड केली. यापुढेही ते समाजाचे आपण समाजाचं काही काही देणे लागतो हा उदांत हेतू डोळ्यासमोर ठेवून ठिकठिकाणी बेलपत्री वृक्षांची लागवड केली. यावेळी त्यांच्यासोबत अनेक भक्त उपस्थित होते त्यांच्या ह्या उपक्रमाचं समाजात सर्वत्र कौतुक होत आहे व अनेक ठिकाणाहून अभिनंदन, आपल्या कार्याला शुभेच्छा असं कौतुक केले जात आहे.















