🔴 क्रांती ज्योती सावित्रीबाई
फुले यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
सांगली मेहकर : दि.०३/०१/२०२५ रोजी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जनसंपर्क कार्यालय मेहकर येथे क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संदिप गवई यांनी अतिशय उत्कृष्ट विचार मांडून आपले मनोगत व्यक्त करतेवेळी सांगितले की क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून महिलांना शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली असून त्यांचे विचार समजास प्रेरणा देणारी आहे. असे प्रतिपादन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केले.
यावेळी समस्त पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)