21.9 C
New York
Friday, September 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

*अशोक लेलँड कंपनीचे पुनर्जीवन करण्यासाठी पुढाकार घ्या…*

*अशोक लेलँड कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घ्या.*

*खा. सुनील मेंढे यांचा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे आग्रह*

भंडारा: मागील काही वर्षांपासून अशोक लेलँड कंपनीच्या गडेगाव येथील युनिटमध्ये वाहनांचे चेसीस आणि इतर महत्त्वाच्या भागाचे उत्पादन बंद झाल्याने हा प्रकल्प व्यवस्थापनाला तोट्यात असल्याचे जाणवू लागले आहे. प्रकल्प बंद झाल्यास जिल्ह्याच्या विकासालाही खीळ बसण्याची शक्यता आहे. अशावेळी या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन व्हावे या दृष्टीने आपण पुढाकार घेऊन व्यवस्थापनाशी बोलावे, असा आग्रह खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केला. या अनुषंगाने एक पत्र देत परिस्थितीशी मंत्री महोदयांना अवगत केले आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात असलेल्या गडेगाव येथे हिंदुजा समूहाचा अशोक लेलँड कारखाना १९८२ पासून कार्यरत आहे. या कारखान्यात बसचे चेसिस, गिअर बॉक्स चे उत्पादन घेतले जात होते. मात्र मागील सहा सात वर्षांपासून या प्रकल्पात हे उत्पादन बंद करण्यात आले. आता केवळ गिअर बॉक्सच्या काही भागांचे उत्पादन केले जाते. आणि एक्सल तयार करण्याचे काम इतर प्रकल्पांमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे. या प्रकारामुळे कामगार आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे, असेही खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटीदरम्यान सांगितले.
सध्या या प्रकल्पात ३५० कायमस्वरूपी कर्मचारी तर ४५० कंत्राटी कामगार आहेत. सद्यस्थिती पाहता कंपनीचे व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचे पगार आणि कंत्राटी कामगारांना दिले जाणारे पगार व इतर खर्च यामुळे प्रकल्प तोट्यात चालत असल्याच्या मानसिकतेत आले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये विविध चर्चा आणि भीतीचे वातावरण आहे. अशावेळी कर्मचारी आणि कामगारांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने या कारखान्याचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे. या कारखान्यात इलेक्ट्रिकल बस, ट्रक हलकी मोटर वाहने तयार केली गेल्यास हा प्रकल्प व्यवहार्य आणि फायद्याचा ठरू शकतो. या प्रकल्पामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकासही साधला जाऊ शकतो. कामगार आणि कर्मचाऱ्यांचे हित तसेच भंडारा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने हिंदुजा समूहाच्या व्यवस्थापनाशी बोलून प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावावी, असा आग्रह यावेळी सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धरला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या