🔴 कॉंग्रेस राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांच्या कडून चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी :निळकंठ जाधव
नांदेड जिल्हा खासदार नायगाव येथील कै.वसंतराव पा.चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पित करून, कॉंग्रेस पक्ष चव्हाण कुटूंबीया नेहमी सोबत राहील असा धीर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी दिला.
नांदेड लोकसभा दिवंगत खासदार वसंतराव पा.चव्हाण यांचे दुःखद निधन झाल्याने चव्हाण कुटुंबियांना धीर देण्यासाठी देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे लोकसभा निवडनुकी नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र दौर्यावर आले असताना (दि.५ सप्टेबंर २०२४) रोजी कै.खा.वसंतराव पा.चव्हाण यांच्या नायगाव येथील निवास स्थानी भेट देऊन श्रद्धांजली अर्पित करीत चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले.
कै.खा.वसंतराव चव्हाण यांचे दि.२६ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले होते यामुळे राजकीय क्षेत्रासह, सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रात फार मोठी हाणी झाली असुन कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे चव्हाण कुटुंबीयावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून यामुळे महाराष्ट्र दौर्यावर असलेले केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी व कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे आज (दि.५ सप्टेबंर) रोजी चव्हाण परिवाराच्या निवास स्थानी भेट देऊन खा.वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा.रविंद्र चव्हाण, इंजि. रणजीत चव्हाण व बंधु केशवराव पा.चव्हाण,हनमंतराव पा.चव्हाण, सुधाकर पा.चव्हाण, आनंदराव पा.चव्हाण, श्रीनिवास पा.चव्हाण, विजय पा.चव्हाण, श्रीधर पा.चव्हाण, विश्वास पा.चव्हाण, पंकज पा.चव्हाण यासह चव्हाण कुटुंबीयांचे सांत्वन केले यावेळी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खा.नागेश पा. आष्टीकर, आ.अमित देशमुख, आ.मोहन अण्णा हबंर्डे, बी.आर.कदम, हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, मोगलजी शिरसेठवार यांसह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र मडंळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि तहसील परिसरात हेलिकॉप्टर उतरले.
आज सकाळी १०: ३० वाजता राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर नायगाव येथील तहसील परिसरात उतरले यावेळी नायगाव नगर पंचायतचे नगराध्यक्षा अर्चना ताई चव्हाण, कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिष्ट मंडळ उपस्थित होते. पोलीस प्रसाशनाच्या वतीने शहरात चोख बंदोबस्त होता.
राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांच्या नायगाव भेटी दरम्यान पोलीस प्रसाशनाच्या वतीने अगोदरच बंदोबस्तात वाढ करण्यात आला होता याच अनुषंगाने आज नायगाव आठवडी बाजार असल्याने व्यापारी बाजार पेठेत येण्यापुर्वीच मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा दाखल होऊन शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील छोटे छोटे रस्तेही बंद करण्यात आले होते.