22.1 C
New York
Friday, September 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️संतोष पाटील थडके यांची भारतीय मराठा महासंघ मराठवाडा विभाग युवा पदाधिकारी पदी निवड.

♦️संतोष पा.थडके यांची भारतीय मराठा महासंघ मराठवाडा विभाग युवा पदाधिकारी व इतर निवड.

देगलूर: भारतीय मराठा महासंघाची देगलूर येथे लोकनिधी अर्बन मल्टिस्टेट बँक येथे दि.०३ सप्टेंबर २४ रोज मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी युवा आयकॉन… मराठवाडा विभाग युवा पदाधिकारी पदी संतोष पा. थडके यांची निवड करण्यात आली तसेच नियुक्ती प्रमाणपत्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्या सहित शाल, श्रीफळ, देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस डॉ. सुनील जाधव, जयदीप वरखिंडे, बालाजी एकनाथराव पा. थडके, शिवगर्जना न्यूज संपादक शहाजी वरखिंडे, सूधाकर जबडे यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. डॉ. सुनील जाधव यांनी प्रस्ताविक पर सुरेख आवाजात जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमास सुरुवात केली. मान्यवरा सहीत नूतन पदाधिकाऱ्यांनी आप आपले मत मांडले. 

देगलूर तालुक्यातील नूतन पदाधिकारी भारतीय मराठा महासंघ उपा.जयदीप वरखिंडे यांच्या हस्ते (युवा अध्यक्ष मराठवाडा विभाग) संतोष एकनाथराव पा. थडके, (युवा तालुकाध्यक्ष) चेतन पाटील घरडे, (तालुका उपाध्यक्ष मुखेड) ज्ञानेश्वर पाटील हसणाळे, (युवा तालुका उपाध्यक्ष देगलूर) बालाजी पाटील हाडोळे, (युवा तालुका सचिव) राजेश प्रकाशराव पाटील, (युवा तालुका सोशल मीडिया) अवधूत निळकंठराव शिंदे निवड झाली. तसेच यावेळी  कार्यकर्ते, पत्रकार बांधव, बंधू, भगिनी यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या