🔴 विविध विभागाच्या वतीने १००० वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा मानस घेऊन केली सुरुवात.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ संदीप काकड
नाशिक – मेरी म्हसरूळ, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी म्हसरूळ पोलिस स्टेशनच्या वतीने व मिडिया मंत्रा व ब्रेन ट्रेन एज्युकेशन संस्था, कर्तव्यदक्ष फौंडेशन, वनविभाग म.न.पा. व मेरी विभागाच्या वतीने १००० वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा मानस घेऊन सुरुवात केली यामध्ये म्हसरूळ पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अतुल डहाके यांच्या व वन विभागाच्या वतीने सुनिता देशमुख मॅडम यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले व निसर्ग कसा जोपासला पाहिजे झाडाची काळजी व संगोपन कसे करावे याबद्दल माहिती दिली. व त्यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळेस कर्तव्यदक्ष फौडेंशन चे श्री सुनील परदेशी यांनी ही झाडाच्या संगोपन बद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी शेकडो मुले, मुली व संस्था चे पदाधिकारी उपस्थित होते. वृक्षावल्ली फौंडेशन च्या वतीने तृप्ती काटकर, सौरभ वेधणे, कर्तव्यदक्ष फाऊंडेशन च्या वतीने सुनिल परदेशी, विरेंद्र सिंग टिळे, रोहिणी ताई कुमावत, राजेंद्र आहेर, राजेंद्र लिंबकर, डॉ. संदिप काकड, आदित्य पवार तसेच ३५ कौशल्य विकासचे विद्यार्थी ज्ञानदीप क्लास विद्यार्थी व शिक्षक महिला नागरिक सहभागी झाले होते हा कार्यक्रम झाल्यानंतर अल्प उपहार, चहा करण्यात आला.