⚫ दुःखद निधन… दुःखद निधन…
गंगाबाई बामणे पाटील.
प्रतिनिधी,
सूगाव : सूगाव ता. देगलूर येथील प्रतिष्ठित, जेष्ठ महिला नागरिक श्रीमती गंगाबाई हाणमंतराव पाटील बामणे यांचे आजाराने शनिवारी दि.१३ रोजी पहाटे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६८ वर्ष होते. त्यांच्यावर शनिवारी दुपारी सुगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातु, पणतु असा मोठा परिवार आहे. देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आत्माराम पाटील सुगावकर यांच्या त्या भावजय तसेच निवृत्त प्राचार्य अविनाश बामणे, शालेय समितीचे अध्यक्ष शामराव बामणे यांच्या त्या मातोश्री होत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो 💐💐💐💐 🙏