12.8 C
New York
Saturday, October 31, 2026

Buy now

spot_img
spot_img

*विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत देगलूर महाविद्यालयातील खेळाडूंना सूवर्णपदक*

*देगलूर महाविद्यालयातील खेळाडुंना विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत सुवर्ण पदक*

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर आयोजित नांदेड येथे दि.१०/१०/२०२३ व ११/१०/२०२३ रोजी आयोजित आंतर महाविद्यालयीन विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत अ, ब, क,आणि ड विभागातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला यातून “ब” विभागा मधून देगलूर महाविद्यालयातील तीन खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड मधून कू. गुडूप शिवरानी ने ४०० मी. धावणे मध्ये सुवर्ण पदक, २०० मी. रजत तर ४x१०० मी व ४x४०० मी. रिले मध्ये सुवर्ण पदक तसेच कु. कोडमुंजा नेहा या खेळाडूने ४x४०० मी. रिले मध्ये सुवर्ण पदक तर हिरेवाड बालाजी याने १०० मी. मध्ये कांस्य पदक व ४x१०० मी. रीले मध्ये कांस्य पदक पटकावत देगलुर महाविद्यालयाची यशस्वी परंपरा विद्यापीठात कायम ठेवली आहे. या यशाबद्दल
अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार, उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ. कर्मवीर उंग्रतवार, जनार्दन चिद्रावार, गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार, चंद्रकांत नारलावार, देगलुर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ, ऊपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. ऊत्तमकुमार कांबळे, पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील, कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यानी यांनी आभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या