12.8 C
New York
Saturday, October 31, 2026

Buy now

spot_img
spot_img

*मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथालय अनुदान प्रणालीचा शुभारंभ*

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ

मुंबई दि.११ –
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांनी संगणकाधारीत “ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली (Library Grant Management System) विकसित केली आहे.
या प्रणालीचा शुभारंभ मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आला.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबाळ, ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर व *नवनियुक्त प्रतापराव सुर्यवंशी साहेब* राज्य ग्रंथालय संचालनालय व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ग्रंथालय विषयक सर्व कामकाज ऑनलाइन पध्दतीने सुरु होणार असून ग्रंथालयांच्या कामकाजाची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

अनुदान वितरण प्रक्रियेचा जिल्हा स्तरावरील टप्पा कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व ग्रंथालयांना एकाच दिवशी आणि एकाच वेळी अनुदान मिळणार आहे. त्याबाबतची माहिती सुद्धा ग्रंथालयास एसएमएस द्वारे मोबाईलवर मिळणार आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या