*सिद्धांत व व्यवहार शिकविल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही.
डॉ.भूषणकुमार जोरगुलवार*
देगलूर
कोणतेही राष्ट्र असो त्या राष्ट्राच्या नेतृत्वाला नैतिक अधिष्ठान असावे लागते. सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष असो त्यांच्यात आपुलकीचे व मैत्रीपूर्ण संबंध पाहीजेत, राजकारण व नैतिकता ही बाब दुर्मीळ होत चाललेली आहे. पूर्विच्या राजकारणात परस्पर विश्वास व आपूलकी दिसून येत होती. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे विरोधी पक्ष नेते राम मनोहर लोहिया यांना संसदेतील रत्न संबोधत होते. आज सत्ताधारी व विरोधी पक्षात शत्रुत्वाची व द्वेषाची भावना वाढत असून ही बाब लोकशाहीला पूरक नाही. आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले जाणारे राज्यशास्त्र विषयाचे ज्ञान हे भविष्यकाळात राजकीय पटलावर उपयोगी असणे आवश्यक आहे. त्यासाठी सिद्धांत व व्यवहार शिकवील्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही.
समाज, राष्ट्र व संस्कृती निर्माण करण्याचे कार्य शिक्षणाच्या माध्यमातून प्राध्यापक वर्गाला करावे लागणार आहे. अलीकडच्या काळात राजकीय परिस्थितीचा विचार करता राज्यशास्त्राच्या अभ्यासकासमोर अनेक अव्हाने आहेत. सध्याला सत्तेच्या राजकारणात ममत्व, स्वार्थ व इतर गोष्टीला महत्व झाले आहे. या सर्व राजकीय अव्हानाचा वेध घेवून विद्यार्थ्याला राजकीय क्षेत्रासाठी जागरूक केले पाहिजे असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे जेष्ठ लेखक व अभ्यासक, डॉ.भूषणकुमार जोरगुलवार यांनी व्यक्त केले ते अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व *स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य जनार्धण चिद्रावार, प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र राज्यशास्त्र, लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. वाघ, सचिव डॉ.संभाजी पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.बी. चिद्रावार, डॉ.प्रमोद पवार, माजी सचिव डॉ.मनोहर पाटील, मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र विभागातील डॉ.लियाकत खान, आदर्श महाविद्यालय हिंगोलीचे प्राचार्य डॉ.विलास आघाव अडत व्यापारी शिक्षण संस्था कार्यकारिणी सदस्य रवींद्र अप्पा द्याडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रा.भालेकर व प्रकाश सोनकांबळे यांनी स्वागत गीताने झाली व मान्यवरांच्या हस्ते स्वामिजींच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ.ए.बी. चिद्रावार यांनी स्वागतपर विचार मांडले.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर.बी. लगशट्टे लिखीत “ महाराष्ट्र का लिंगायत समाज” व डॉ.गुंडेराव एस.सी. यांनी संयुक्तपणे लिहिलेला “डॉ.जनार्दन वाघमारे : एक राजकीय नेतृत्व “ असे दोन ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. प्रस्तुत नवीन चर्चासत्रात विविध राजकीय मुद्दे व पेचप्रसंगावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. प्रस्तुत चर्चासत्रात महाराष्ट्र राज्यातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधक व लेखकांचे एकूण ८५ संशोधन लेख एकत्रित करुण ‘ राज्य राजकारण : मुद्दे आणि पेचप्रसंग’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मार्फत ऊपप्राचार्य प्रा. उत्तमकूमार कांबळे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.एम.चोले यांनी केले. आभार लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. बी. आर. कत्तूरवार यांनी मानले. दयानंद महाविद्यालयाचे माजी ऊपप्राचार्य प्रा गंगाधर हिंगोले यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.















