दिगंबरराव देशमुख विद्यालय येथे शिक्षण परिषद संपन्न..
नायगाव ता. प्र.
परमेश्वर जाधव
दि. ५ सप्टेबर २०२३ ची शिक्षण परिषद नरसी केंद्राच्या वतीने श्री दिगंबरराव देशमुख प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कांडाळा येथे संपन्न झाली. या केंद्र संमेलनास मा. गटशिक्षणाधिकारी श्री काकडे सर, पंचायत समिती नायगाव तसेच डायट कॉलेजचे अधिव्याख्याता यांची उपस्थिती व नरसी केंद्रातील सर्व शाळेतील शिक्षकांची उपस्थित होती. या संमेलनास नरसी केंद्रामधील साधन व्यक्तींची होती. यावेळी श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ नायगाव संचालीत श्री दिगंबरराव देशमुख प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव देशमुख यांचा वाढदिवस या केंद्र संमेलनावेळी साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास नरसी संकुलाचे केंद्रप्रमुख श्री नरबलवार सर तसेच सर्व शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रथम दीप प्रज्वलन करून सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सूरूवातीस श्री दिगंबरराव देशमुख विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांकडून स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. श्री केंद्रप्रमुख नलबलवार सर यांनी मान्यवरांचे स्वागत हार शाल देऊन सत्कार करण्यापेक्षा सर्व मान्यवरांना वही व पेन देऊन त्यांचे स्वागत करावे. व तेच शैक्षणिक साहित्य शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आले. व शिक्षण परिषदेला सुरुवात करण्यात आली. शिक्षण परिषद संपल्यानंतर श्री सर्जेराव देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व नंतर सुरुची भोजन करुन शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंपाळे सर
तर आभार प्रदर्शन खारटमोल एस.बी. यांनी मानले.















