16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️जिल्हा न्यायालयात महिला वकिलांचे हळदी कुंकू उत्साहात साजरा

🔴 नासिक जिल्हा न्यायालयात महिला वकिलांचे हळदी कुंकू जोरदार पद्धतीने साजरा करण्यात आले. 

शिवगर्जना न्यूज, 

नाशिक {प्रतिनिधी डॉ. शाम जाधव }

दि.२२/०१/२०२५ रोजी नाशिक महिला समिती यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नासिक जिल्हा महिला समिती व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला तसेच जिल्हा विद्युत सेवा प्राधिकरण यांच्या व नाशिक जिल्हा महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला संरक्षण कायद्या विषयी शिबिर घेण्यात आले. सदर शिबिरामध्ये ॲड शामला दीक्षित यांनी स्त्री शक्ती विधेयक कायद्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील सर्व महिला न्यायाधीश, महिला वकील, न्यायालीन महिला कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदर कार्यक्रम जिल्हा महिला समितीच्या सदस्या ॲड सोनल कदम, ॲड शामला दिक्षित, ॲड श्रद्धा जोशी, ॲड स्वप्ना राऊत, ॲड सुप्रिया आमोदकर -देशपांडे, ॲड राणी रंधे -तळेकर, ॲड प्रणिता जोशी कुलकर्णी, ॲड सोनल गायकर यांनी आयोजित केलेला होता. सदरचा कार्यक्रम महिला विधी समितीकडून महिला वकिलांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सदैव आमची समिती तत्पर आहे असे आव्हान करण्यात आले. अतिशय खेळीमेळी व उत्साही वातावरणात सदरचा कार्यक्रम पार पडला. पत्रकार ॲड विनया नागरे ह्या देखील कार्यक्रमात उपस्थित होत्या.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या